आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी मुंबईत असेही एक हॉटेल, जेथे तृतीयपंथी सांभाळताहेत किचन, वेटरचे काम, पाहा...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या या हॉटेलात 6 तृतीयपंथी काम करत आहेत. - Divya Marathi
सध्या या हॉटेलात 6 तृतीयपंथी काम करत आहेत.

मुंबई- आपल्याकडे तृतीतपंथी किंवा हिजडे म्हटले की डोळ्यासमोर चित्र येते ते लोकांना घरी जाऊन शुभेच्छा देणे. सोबतच ट्रेन, बसेस, दुकानांतून लोकांना पैसे मागून आपला उदरनिर्वाह करणे. मात्र, नवी मुंबईतील एका रेस्टांरंटने तृतीयपंथियांच्या जीवनाकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहत बदल करण्याचे ठरवले आहे. यामागचा विचार आहे की, अशा लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेणे. दोन आठवड्यापूर्वी सुरू झालेल्या ‘थर्ड आय’ नावाच्या या कॅफेत सध्या 6 तृतीयपंथियांना नोकरी दिली आहे. या कॅफेत तृतीयपंथीच वेटर असून, ग्राहकांना तेच जेवण वाढतात. किचन संभाळण्याची जबाबदारीही त्यांच्यावरच आहे. या कॅफेत एकून 20 कर्मचारी आहेत. कॅफेत केवळ हिंदी भाषेचा वापर....

 

- अवेक देश फिरलेले या कॅफेचे मालक निमेश यांच्या माहितीनुसार, आम्ही ठरवले की आमच्या कॅफेत फक्त हिंदी भाषा बोलली जावी. शुभेच्छा देताना गुडमॉर्निंग किंवा गुड इव्हनिंगऐवजी फक्त नमस्कार म्हणावे. 
- मात्र, ज्या ग्राहकांना हिंदी समजत नाहीये त्यांच्यासोबत आम्ही इंग्रजीतून बोलतो. 
- कॅफेत ठेवलेल्या सर्व तृतीतयपंथियांना एकाच वेळी ट्रेनिंग दिले गेले.

 

लोकांना केले कौतूक- 

 

- शेट्‌टी सांगतात की, ज्या तृतीतपंथी लोकांना आम्ही नोकरीवर ठेवले आहे ते फार शिकलेले नाहीत.
- त्यांना नोकरी देऊन आम्ही समाजात एक सकारात्मक संदेश देऊ इच्छितो. जेणेकरून अशा लोकांना समाजातील मुख्य प्रवाहात आपण सर्वांनी जोडून घेतले पाहिजे.
- आजची तरूण पिढी खूपच समजदार आहे. ती हे पाहत नाही की कोण काम करत आहे. काम कसे करत आहे हे त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे असते.
- आतापर्यंत कॅफेत येणा-या लोकांकड़ून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
- शेट्‌टी यामुळेही खूष आहेत की, कॅफेत येणा-या लोकांनी तृतीयपंथियांची कल्पना उचलून धरली आहे.

 

अशी आली कॅफे सुरू करण्याची आयडिया-

 

- तृतीयपंथियाना कॅफेट वेटरसह किचनमध्ये ठेवण्याच्या कल्पनेबाबत या कॅफेचे मालक निमेश शेट्‌टी यांनी सांगितले की, मी आर्किटेकचे शिक्षण घेत होतो तेव्हा एका प्रोजेक्टवर काम करत होतो.
- त्यावेळी माझे लक्ष तृतीयपंथियांच्या खिन्न अवस्थेवर पडली. यानंतर मी तृतीयपंथियांसाठी काम करणा-या संस्थेकडे संपर्क साधला.
- या दरम्यान मला सोशल वर्कर गौरी सावंत यांच्याकडून खूप मदत मिळाली. 
- शेट्‌टी म्हणतात, मी ठरवले आहे की तृतीयपंथिय लोकांबाबत समाजात चुकीची धारणा आहे ती बदलवणे.
- हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याची आपण जास्तीत जास्त संधी उपलब्ध करू.
-  शेट्‌टी यांनी सांगितले की, माझे वडिल यापूर्वीच हॉटेल इंडस्ट्रीमध्ये होते त्यामुळे मला हे कॅफै खोलण्यास काहीच त्रास झाला नाही. 

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, नवी मुंबईतील थर्ड आय कॅफेमधील नजारा....

बातम्या आणखी आहेत...