आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Murder : 11 वर्षीय मुलाची गळा चिरुन हत्या, उल्हासनगरमधील धक्कादायक घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- उल्हासनगरमध्ये अवघ्या 11 वर्षाच्या मुलाची गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. हर्ष आल्हाट असे मृत मुलाचे नाव असून पोलिस या प्रकरणी तापास करत आहेत.


उल्हासनगर येथे हर्ष हा आई-वडिलांसोबत राहत होता. सोमवारी रात्री तो आईसोबत ती काम करत असलेल्या एका कापडाच्या कारखाण्यात गेला होता. दरम्यान, रात्री नऊ वाजेच्या सुमासार हर्ष लघुशंकेसाठी बाहेर गेला, तो परतलाच नाही. आई कामावरून घरी पकतली तेव्हा हर्ष घरी नव्हता.  त्याचा शोध घेतला तेव्हा शेजारील एका खोलीत त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे आईला मोठा धक्का बसला आहे. हर्षच्या हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...