आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाना पटोले पश्चाताप यात्रा संपल्यावर जानेवारीत काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/नागपूर- भाजपच्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आता नाना पटोले जानेवारी महिन्यात काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. नाना पटोले हे पश्चाताप यात्रा काढणार आहेत. हा दौरा संपल्यानंतर जानेवारी महिन्यातच त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असल्याचे म्हटले जात आहे.

 

 

खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतरची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी आज त्यांनी लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांची भेट घेतली. कधी कधी भावनेच्या भरात असे निर्णय घेतले जातात, त्यामुळे त्याबद्दलची खात्री करुन घेण्यासाठीची ही प्रक्रिया असते. लवकरच राजीनामा स्वीकारल्याबद्दलचे अधिकृत पत्रक लोकसभा सचिवालयाकडून जारी होऊ शकते.

भाजपची खासदारकी धुडकावल्यानंतर नाना पटोले हे काँग्रेसच्या मंचावर दिसले होते. 11 डिसेंबर रोजी अहमदाबादमध्ये राहुल गांधींच्या एका सभेत नाना पटोले होते.

 

 

राजीनामा दिल्याच्या दिवशीच काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश हेही नानांच्या भेटीसाठी निवासस्थानी पोहचले होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या काँग्रेस प्रवेशाबद्दलच्या हालचाली सुरु आहेत यांचे संकेत मिळत आहेत. सहसा अशी खासदारकी सोडून पक्षात येणाऱ्यांना लगेच राज्यसभा किंवा विधानपरिषदेची ऑफर दिली जाते. त्यानुसार राहुल गांधींनी नानांना तुम्हाला कुठले पद हवे असे विचारले. मात्र त्यावर मी काही मागण्यासाठी नव्हे तर देण्यासाठी आलोय. तुमच्या सोबत प्रचार करेन, शेतकऱ्यांची ताकद मजबुतीने उभी करण्यासाठी प्रयत्न करेन, असे उत्तर दिले. त्यावर राहुल गांधींनी "ओह नाईस फेलो" असे म्हणत नानांचे कौतुक केले.  

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

 

 

बातम्या आणखी आहेत...