आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांच्या भेटीला राणे विधिमंडळात; राज्यसभेबाबत अद्याप कोणताही निर्णय नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी विधिमंडळात अाले हाेते. या दोन नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली. या भेटीनंतर माध्यमांशी बाेलताना राणे म्हणाले की, अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. राज्यसभेच्या निवडणुकीचा विषय मुख्यमंत्र्यांनीच काढला. मात्र अद्याप माझा कोणताही निर्णय झालेला नसल्याचे राणेंनी सांगितले.

 

भाजपकडून अनेक जण इच्छूक-

पुढील महिन्यात रिक्त होणा-या राज्यसभा खासदारांत महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. सध्याच्या विधानसभेतील संख्याबळानुसार, भाजपचे तीन तर काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचा प्रत्येकी एक सदस्य निवडून जाणार आहे.

 

भाजपकडून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना गृहराज्य महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठवले जाणार आहे. उर्वरित दोन जागांसाठी रस्सीखेच आहे. नारायण राणे, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान, विद्यमान खासदार अजय संचेती, शायना एनसी, विजया रहाटकर आदींची नावे चर्चेत आहेत. राणेंना राज्यसभेवर जाण्यास होकार दिल्यास इच्छुकांतून एकालाच संधी मिळणार आहे.

 

काँग्रेसमधून एका जागेवर अनेक जण इच्छुक आहेत. यात सुशीलकुमार शिंदे, अविनाश पांडे, जुनेजानते नेते व प्रवक्ते रत्नाकर महाजन, मुकुल वासनिक आदींची नावे चर्चेत आहेत. 

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, नारायण राणे विधान भवनात आले त्यावेळचे फोटोज....

बातम्या आणखी आहेत...