आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंधूदुर्ग: राणेंच्या मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण, पवारांची उपस्थिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पडवे (सिंधूदुर्ग)- खासदार नारायण राणे यांच्या स्वप्नातील व कोकणातील उच्च दर्जाच्या सुपर स्पेशालिटी एसएसपीएम लाईफटाईम हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पार पडला. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. राज्याचे महसूलमंत्री     चंद्रकांतदादा पाटील, उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन, जलसंधारण मंत्री राम शिंदे आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. 

 

कुडाळ तालुक्यातील कसाल पडवे येथे अत्याधुनिक सोयी सुविधा व उपकरणांसह रुग्ण सेवेसाठी सज्ज झालेले व 650 रुग्ण क्षमतेचे लाईफ टाईम हॉस्पिटल व वैद्यकीय महाविद्यालयाची उभारणी करण्यात आली आहे. 

 

अद्ययावत सुविधांनी सुसज्ज अशा या रुग्णालयात आतापर्यंत कोकणात उपलब्ध नसलेल्या सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यापूर्वी कोकणातील रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय उपचारांसाठी मुंबई, पुणे, गोवा, मिरज, कोल्हापूर, बेळगाव या ठिकाणी जावे लागत होते. असे हॉस्पिटल उभे राहिल्याने आता कोकणातील रुग्णांना या ठिकाणी तातडीचे आणि अत्याधुनिक उपचार मिळणार आहेत. कोकणच्या वैभवात भर घालणा-या या 650 बेडच्या हॉस्पिटलमध्ये अद्ययावत सुविधांनी सुसज्ज अशा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये न्युरोलॉजी, कार्डीओलॉजी, युरोलॉजी, आयव्हीएफ, नेफ्रोलॉजी, ट्रॉमा अ‍ॅण्ड स्पाईन सर्जरी, नी रिप्लेसमेंट, आँकोलॉजी व एअर अ‍ॅम्बुलन्सचीही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

 

या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज व दर्जेदार असे दृकश्राव्य उपकरणाने सज्ज 12 अद्ययावत मॉडय़ुलर ऑपरेशन थिएटर, सिटी स्कॅन, एमआरआय मशीन, एक्सरे मशीन, 64 बेडचे आयसीयु, एनआयसीयु, पी.आयसीयु, एसआयसीयु, आयआयसीयु, ट्रामा आयसीयुची सुविधा आहे. तसेच ईमेजिंग विभागात डिजीटल एक्सरे-300 एमए व 600 एमए युएसजी फोरडी सिटीस्कॅन 16 स्लायसेस, एमआरआय 1.5 टेस्ला, मॅमोग्रॉफीच्या अद्ययावत सुविधा आहेत.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, हॉस्पिटलच्या लोकार्पण सोहळ्याचे फोटोज....

 

बातम्या आणखी आहेत...