आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच प्रचारात उतरणार नारायण राणे, शिवसेनेविरोधात डागणार तोफ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यसभेचे खासदार नारायण राणे हे पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेविरोधात भाजपचा प्रचार करणार आहेत. सूत्रांनुसार राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतीला मान देऊन प्रचारात उतरायचे ठरवले आहे. शिवाय शिवसेनेशी असलेले त्यांचे वैरही सर्वश्रृत असल्याने राणे विरुद्ध शिवसेना असाच सामना रंगणार आहे. 

 

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते असलेल्या नारायण राणे यांना भाजपने राज्यसभेची खासदारकी दिली आहे. खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच भाजप राणेंना शिवसेनेविरुद्ध भिडवणार आहे. भाजपचे खासदार चिंतामणराव वनगा यांच्या निधनानंतर पालघर लोकसभेची जागा रिक्त झाली होती. त्यानंतर अनेक नाट्यमय घडामोडी घडत वनगा कुटुंबियांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेने चिमामण वनगा यांचे सुपुत्र श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने काँग्रेसमधून आयात केलेले राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसकडून दामोदर शिंगडा यांनी उमेदवारी दाखल केली आहे. या पोटनिवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले असतानाच भाजपने राणेंने प्रचाराच्या मैदानात उतरवून नवीन खेळी खेळल्याचे बोलले जात आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...