आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमित शहांच्या भेटीनंतर राणेंची स्वारी खूष, पण राज्यात की केंद्रात यावर सस्पेन्स कायम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांची बुधवारी रात्री नवी दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. - Divya Marathi
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांची बुधवारी रात्री नवी दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

मुंबई- माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांची बुधवारी रात्री नवी दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री नारायण राणे, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, आमदार नितेश राणे हे उपस्थित होते. दरम्यान, या बैठकीनंतर राणेंचा चेहरा खुलला होता व त्यांच्या चेह-यावर स्मितहास्य होते. भाजपकडून तारीख पे तारीख मिळाल्यानंतर राणे खूशीत दिसल्याने त्यांची 'इच्छापूर्ती' होणार असे संकेत मिळत आहेत.

 

बुधवारी रात्री उशिरा राणे, पुत्र नितेश, फडणवीस, शेलार हे अमित शहांच्या घरी दाखल झाले. यानंतर त्यांच्यात तासभर चर्चा झाली. तासाभरानंतर एकाच गाडीत फडणवीस, राणे व शेलार अमित शहांच्या घरातून बाहेर पडले. त्यानंतर काही वेळाने नितेश राणे बाहेर पडले. मात्र, अमित शहांच्या घराबाहेर पडताना राणे यांची स्वारी खूष दिसत होती. तसेच चेह-यावर स्मितहास्य होते. त्यामुळे भाजप अखेर त्यांची इच्छापूर्ती करणार असे मानले जात आहे. 

 

या महिन्याअखेर राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. यात भाजपला सध्याच्या संख्याबळानुसार तीन जागा मिळणार आहेत. त्यातील एका जागेवर नारायण राणेंना पाठविण्याचा भाजपचा विचार होता. मात्र, राणेंना राज्यातच रस असल्याचे पुढे आले. शिवसेनेची भविष्यातील गरज व राणेंना त्यांचा विरोध लक्षात घेत मुख्यमंत्री राणेंना दिल्लीत पाठविण्याच्या मनस्थितीत आहेत. त्यामुळे काल रात्रीच्या बैठकीत राणेंचा विषय मुख्यमंत्र्यांनी पक्षाध्यक्षांकडे नेला. यात त्यांच्यात तासभर सविस्तर चर्चा झाली.

 

अमित शहा व आशिष शेलार यांना नारायण राणेंचा वापर शिवसेनेविरोधात मुंबई व कोकणात करून घ्यायचा आहे. त्यामुळे राणेंना राज्यातच कॅबिनेट मंत्रीपद द्यावे असे शेलार यांचे म्हणणे असल्याचे कळते. अमित शहा यांना सुद्धा शेलार यांची रणनिती मान्य आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांना तसे वाटत नाही. पुढील वर्षी लोकसभा-विधानसभा निवडणुका होत आहे. भाजपविरोधात जनमत तयार होऊ लागले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी हे विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. अशा स्थितीत शिवसेनेला दुखावणे किंवा सोडून देणे परवडणारे नाही याची जाणीव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आहे. त्याचमुळे राणेंना दिल्लीत राज्यसभेवर पाठवावे तसेच त्यांना केंद्रात मंत्रीपद द्यावे असा मनोदय मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्याचे कळते. 

 

अमित शहांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले व लवकरच यावर तोडगा काढू असे आश्वासन दिले. राणे यांनीही आपण राज्यातच काम करण्यास उत्सुक असून, मी तेथे कसा फायदेशीर ठरू शकतो याची माहिती दिली. अमित शहांनी तुमची उपयुक्तता असल्याचे राणेंना सांगितले. यामुळे राणेंची स्वारी खूष झाली. मात्र, सहा महिन्यांपासून तारीख पे तारीख देणारे भाजप राणेंना राज्यात मंत्रीपद देणार की दिल्लीत पार्सल करून पाठविणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच.  

बातम्या आणखी आहेत...