आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छगन भुजबळांच्या मदतीमुळेच मी विजयी होऊ शकलो- शिवसेनेच्या दराडेंचा गौप्यस्फोट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुजबळ कुटुंबियांची शिवसेनेशी जवळिक वाढत चालल्याचे बोलले जात आहे. - Divya Marathi
भुजबळ कुटुंबियांची शिवसेनेशी जवळिक वाढत चालल्याचे बोलले जात आहे.

नाशिक- राष्ट्रवादीचे नाशिकमधील बडे नेते छगन भुजबळ यांच्या मदतीमुळेच माझा विजय सुकर झाला, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे विजयी उमेदवार नरेंद्र दराडे यांना केला. भुजबळांसह इतर पक्षांतील सर्वच नेत्यांची मला मदत झाली असेही दराडेंनी दावा केला.

 

स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधान परिषदेत निवडून जाणा-या पाच जागांचे आज निकाल लागले.   यात शिवसेना आणि भाजपला प्रत्येकी 2 जागांवर विजय मिळाला आहे. तर राष्ट्रवादीला एक जागा मिळाली. नाशिक आणि परभणी-हिंगोलीची जागा शिवसेनेने जिंकली तर भाजपने आपल्या पूर्वीच्या अमरावती व वर्धाची जागा राखली. कोकणची जागा तटकरेंनी जागा आपल्याच घरात ठेवण्यात यश मिळवले. मात्र, नाशिकमध्ये शिवसेनेने जिंकलेल्या जागेमुळे राजकीय वर्तूळात चर्चा सुरू झाली आहे.

 

वास्तविक, नाशिकमध्ये भाजपने राष्ट्रवादीला पाठिंबा दिला होता. त्यामुळे शिवाजी सहाणे यांच्या पारडे जड मानले जात होते. मात्र, प्रत्यक्ष निकालात सहाणेंपेक्षा शिवसेनेच्या दराडेंना 193 मते अधिकची पडली. या मताधिक्क्यामुळे शिवसेनेने मतांची बेगमी कशी केली याची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत शिवसेनेचे विजयी उमेदवार दराडे यांनी बोलताना सांगितले की, मला सर्वच पक्षीयांची मदत झाली आहे. छगन भुजबळ साहेबांच्या मदतीमुळेच माझा विजय सुकर झाला.

छगन भुजबळ नुकतेच तुरूंगातून जामिनावर बाहेर आले आहेत. यानंतर नुकतेच शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी भुजबळांची रूग्णालयात जाऊन दीड तास चर्चा केली होती. सोबतच भुजबळांचे चिरंजीव आमदार पंकज यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली होती. त्यामुळे भुजबळ कुटुंबियांची शिवसेनेशी जवळिक वाढत चालल्याचे बोलले गेले. आता शिवसेनेचे उमेदवार दराडे यांनी भुजबळांची मदत झाली अशी जाहीर कबुली दिल्याने भुजबळांच्या शिवसेनेच्या जवळिकीच्या चर्चेला नव्याने तोंड फुटू शकते.

 

राष्ट्रवादीने मात्र हा दावा फेटाळून लावला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे की, भुजबळांनी शिवसेनेला मदत केली नाही तर भाजपने राष्ट्रवादीला मते देण्याचे जाहीर केल्यानंतरही शिवसेनेला मतदान केल्याचे स्पष्ट झाले आहे. 

बातम्या आणखी आहेत...