आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: छगन भुजबळांचे येवल्यासह नाशिक जिल्ह्यात \'न भूतो न भविष्यती\' स्वागत!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- महाराष्ट्र सदन घाेटाळ्यासह नानाविध अाराेपांमुळे तब्बल दाेन वर्ष तुरुंगात असलेले व अलीकडेच जामिनावर सुटलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ सध्या नाशिक जिल्ह्याच्या दौ-यावर आहेत. छगन भुजबळ व माजी खासदार व त्यांचे पुतणे समीर भुजबळ हे अडीच वर्षांच्या कालावधीनंतर गुरूवारपासून (14 जून) नाशिक दौ-यावर आहेत. तुरूंगातून सुटल्यानंतर हे काका- पुतणे पहिल्यांदाच नाशिक दौ-यावर आहेत.

 

दरम्यान, छगन भुजबळ गेली चार दिवस विविध भागाच्या दौ-यावर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसह समता परिषदेचे व सर्वपक्षीय नेते व पदाधिकारी त्यांचे ठिकठिकाणी स्वागत करत आहेत. 

 

भुजबळ म्हणाले, माझ्या अडचणीच्या काळात एक नाशिकर म्हणून तुम्ही माझ्या व माझ्या कुटुंबियांच्या पाठीशी राहिला त्याबाबत सर्वांचे आभार मानतो. तुम्ही दिलेले प्रेम कधीच विसरणार नाही. तुमचे प्रेम माझ्यावर व माझ्या कुटुंबियांवर राहील असा विश्वास व्यक्त करतो. माझ्या सुटकेसाठी मागे तुम्ही लोकांनी एक मोठा मोर्चा काढला तो क्षण मी कधीही विसरणार नाही. गेले दोन अडीच वर्ष मला नाशिक जिल्हा व महाराष्ट्र भरातून लोक भेटण्यासाठी येत होते. यासर्व लोकांच नातं रक्ताच्या पालिकडचं असल्याचं राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. ते नस्तनपूर येथे स्वागत समारंभाप्रसंगी बोलत होते.

 

दरम्यान, भुजबळ यांच्या दाैऱ्यादरम्यान, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी स्वागत साेहळ्याच्यानिमित्ताने जाेरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. अनेक ठिकाणी हाेर्डिंग्जही लावली आहेत. 19 जूनपर्यंत भुजबळ जिल्हा दाैऱ्यावर राहणार असून प्रामुख्याने शिर्डीनंतर त्र्यंबकेश्वर, सप्तशंृग गडावर जात दर्शन घेतले. याबराेबरच मंगळवारी (19 जून) जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे विविध मागण्यांसाठी निवेदनही देतील. भुजबळ यांच्या नाशिक दाैऱ्यामुळे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण अाहे.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, छगन भुजबळांचे नाशिक जिल्ह्यातील दौ-याची छायाचित्रे.....

 

बातम्या आणखी आहेत...