आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इच्छा नसतानाही हसन मुश्रीफांना अखेर धनंजय महाडिकांच्या घरी जेवायला जावे लागलेच!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खासदार धनंजय महाडिकांच्या घरी डिनरला जमलेले शरद पवार, निवेदिताा माने व संध्या कुपेकर.... - Divya Marathi
खासदार धनंजय महाडिकांच्या घरी डिनरला जमलेले शरद पवार, निवेदिताा माने व संध्या कुपेकर....

कोल्हापूर- शरद पवार सध्या कोल्हापूर दौ-यावर आहेत. या दौ-यात पवार पक्ष व गटतट विसरून सर्वांना भेटत आहेत. रविवारी सायंकाळी कोल्हापूरात पोहचताच पवार डी वाय पाटलांच्या घरी गेले. डी वाय पाटील व सतेज पाटील यांच्या घरी पाहुणचार घेतल्यानंतर पवारांनी रात्रीचे भोजन आपल्याच पक्षाचे पण सध्या भाजपशी जवळिक ठेऊन असलेल्या खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे भोजनाला गेले. 

 

खासदार महाडिक यांनी पवारसाहेबांसह उपस्थित सर्व नेत्यांना रात्रीच्या भोजनाचे आमंत्रण दिले. यानंतर पवारांनी माझ्यासमवेत महाडिकांच्या घरी भोजनला चला असा आदेश काँग्रेस जिल्हाध्यक्ष के. पी. पाटील व ज्येष्ठ आमदार हसन मुश्रीफ यांना दिला. यावर के पी यांनी मला एका नियोजित कार्यक्रमाचे निमंत्रण आहे त्यामुळे तेथे जावे लागेल. यावेळी मी येऊ शकत नाही फार आग्रह धरू नका असे पवारांना सांगितले. यावर पवारांनी त्यांना पुढील कार्यक्रमाला जाण्यासाठी सूट दिली. 

 

शरद पवारांनी मग मुश्रीफांकडे आपला मोर्चा वळविला. मात्र, मुश्रीफ यांनीही आपल्याला कार्यक्रमाला जावे लागणार असल्याने तुम्हीच जाऊन या असे सांगितले. यावर पवारांनी तुम्ही काही सांगू नका माझ्यासोबत महाडिकांच्या घरी जेवायला चलाच असा आदेश काढला. त्यामुळे मुश्रीफांनी तत..मम.. करून पाहिले पण पवारांना महाडिक-मुश्रीफांतील संघर्ष माहिती असल्याने त्यांना आवर्जूनच जेवायला घेऊन जायचे होते. महाडिकांच्या घरी जात 'डिनर डिप्लोमसी' करून त्यांच्यातील संघर्ष काही प्रमाणात कमी करता येईल का याची चाचपणी पवार करत होते. अखेर इच्छा नसतानाही व पवारांचाही शब्द मोडता येत नसल्याने मुश्रीफांना महाडिकांच्या घरी डिनरला जावेच लागले. मात्र, मुश्रीफ पवार महाडिकांच्या घरी पोहचल्यावर तासाभराने पोहचले.

 

यानंतर सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी मुश्रीफ-महाडिक यांच्या सत्तासंघर्ष व वादाबाबत छेडले असता, तो आमच्या घरातील वाद आहे. आमचं भांडण कसं सोडवायचं ते आम्ही पाहू. तुम्ही यात पडू नका अशी फटकेबाजी पवारांनी केली. कोल्हापूरचा पुढचा खासदार कोण असे छेडले असता पवारांनी, कोल्हापूरचा पुढचा खासदार दिल्लीत ठरेल असे सांगत मुश्रीफ-महाडिक यांच्यातील शीतयुद्धाला बगल दिली.  

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, शरद पवारांचे कोल्हापूर दौ-यातील फोटोज....

बातम्या आणखी आहेत...