आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्याच्या कृषी क्षेत्राचा नकारात्मक विकास; सरकारचे खापर पावसावर, कापूस उत्पादनात 44 टक्क्यांनी घट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार - Divya Marathi
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई- राज्याचा २०१७-१८ चा आर्थिक पाहणी अहवाल गुरुवारी विधानसभेत मांडण्यात आला. घटत्या विकास दरासह कृषी क्षेत्राची नकारात्मक वाढ, वाढते कर्ज, ४५११ कोटींची वित्तीय तूट अशी चिंताजनक स्थिती अहवालातून समोर आली आहे. आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये १२.५ % दराने वाढणारे कृषी क्षेत्र आगामी आर्थिक वर्षात उणे ८.३ टक्के दर दर्शवण्याची शक्यता अहवालात वर्तवली आहे. तीन वर्षांतील हा नीचांक आहे. राज्यात २०१६-१७ मध्ये सरासरी चांगला ९४.९ % पाऊस पडल्याने त्या वेळी कृषी उत्पादन जास्त झाले, तर २०१७-१८ मध्ये सरासरी ८४.३ % पाऊस पडल्याने कृषी व संलग्न क्षेत्रात मागील वर्षीच्या तुलनेत वजा ८.३ % वाढ अपेक्षित असल्याचे सरकारने म्हटले आहे. या घसरणीचे खापर सरकारने अपुऱ्या पावसावर फोडले. कापूस उत्पादनात ४४ % घट दाखवताना त्यात बोंडअळी व बनावट एचटी बियाण्यांमुळे झालेल्या नुकसानीचे वास्तव मात्र सरकारने लपवले अाहे.

 

कृषी क्षेत्रातील आव्हाने
शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्याची घोषणा केलेल्या सरकारपुढे कृषी क्षेत्रात मोठे आव्हान आहे. अार्थिक पाहणीनुसार, घटत जाणारे वहिती क्षेत्र, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांची वाढती संख्या, पाऊस व हवामान यावरील अवलंबित्व, कमी उत्पादकता ही प्रमुख आव्हाने कृषी क्षेत्रासमोर आहेत.   

 

दरडोई उत्पन्नात चांगली वाढ
राज्याच्या डोक्यावर सध्या ४ लाख १३ हजार कोटी रुपयांचे कर्ज असले तरी दरडोई उत्पन्नात तब्ब्ल १२.१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. हे उत्पन्न १ लाख ६५ हजारांवरून १ लाख ८० हजार रुपयांवर गेले आहे. दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राने कर्नाटक राज्याला (१०.२%) मागे टाकले असल्याचा दावा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला.

 

फलोत्पादनही घसरले

एकूण पीक क्षेत्राच्या राज्य स्थूल मू्ल्यवृद्धीत सरासरी ३० टक्के वाटा असणाऱ्या फलोत्पादनात ५.६ टक्के घट अपेक्षित असल्याचे अहवालात म्हटले आहे. त्याचाही परिणाम कृषी विकासावर होणार आहे.

 

उत्पादन घटीचा फटका

अहवालानुसार, २०१७ चा खरीप हंगाम खडतर राहिला असून तृणधान्य, कडधान्य व कापसाचे उत्पादन कमी होणार आहे. तर उसाच्या उत्पादनात २५ टक्के वाढ अपेक्षित आहे.

 

चिंता नकाे, कर्ज काढू : अर्थमंत्री
राज्याच्या विकासाच्या व्याख्येत आता बदल झाला आहे. यापूर्वी बी फॉर बारामती’ आणि पी फॉर ‘पुणे’ असेच उल्लेख होत असत. परंतु आता त्यात खूप मोठा बदल झाला असून बी फॉर ‘बल्लारपूर’ आणि पी फॉर ‘पोखर्णा’ अशी नवी व्याख्या निर्माण झाली असल्याचा टोला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आर्थिक पाहणी अहवालावर सभागृहात बोलताना विरोधकांना लगावला.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, पीक आणि उत्पादन घट...

बातम्या आणखी आहेत...