आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Netherland च्या राणीने जाणून घेतला मुंबईच्या डबेवाल्यांचा मॅनेजमेंट फंडा, डबेवाल्यांनी दिले खास गिफ्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- नेदरलँडच्या राणी मॅक्झीमा यांनी मुंबईतील डबेवाल्यांची अंधेरी पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेर बुधवारी दुपारी भेट घेतली. यावेळी या डबेवाल्यांनी राणीचे मराठमोळ्या पद्धतीने स्वागत केले. डबेवाल्यांच्या संस्थेचे अध्यक्ष उल्हास उके यांनी त्यांनी डब्यांची प्रतिकृती भेट दिली. 

 

राणी मॅक्झीमा यांनी यावेळी डबेवाल्यांच्या कामाचे व्यवस्थापन जाणून घेतले. डबेवाल्यांच्या व्यवस्थापकांनी राणीस सांगितले, आम्ही सकाळी 8 वाजल्यापासून कामाला सुरुवात करतो. आम्ही २ लाख डब्यांची सेवा संपूर्ण शहरात पुरवत आहोत. शहरात सर्व डबेवाल्यांची एकूण संख्या 5 हजार एवढी आहे. मॅक्झीमा यांनी डबेवाल्यांच्या पगाराच्या नियोजनाबाबत विचारणा केली असता, आम्ही यापूर्वी कॅशने पगार घ्याचो, मात्र आता आमचा पगार पेटीएमने मिळतो. त्यामुळे आमचा वेळ वाचतो आणि त्यामुळे पैशाची देखील बचत होत असल्याची माहिती डबेवाल्यांनी दिली. ब्रिटनच्या 'रॉयल फॅमिली'शी डबेवाल्यांचे खास नाते आहे. तसेच अनेकदा जगभरातील अनेक नेत्यांनी मुंबई भेटीदरम्यान डबेवाल्यांची भेट घेतलेली आहे. यात आता नेदरलँडच्या राणीचाही आता समावेश झाला आहे. 

बातम्या आणखी आहेत...