आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CM पत्नी अमृता फडणवीस आता दिसल्या \'पंजाबी\' अवतारात, हे आहे कारण!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईत अॅक्सेस बॅंकेत व्हाईस प्रेसिंडेट म्हणून काम पाहते अमृता... - Divya Marathi
मुंबईत अॅक्सेस बॅंकेत व्हाईस प्रेसिंडेट म्हणून काम पाहते अमृता...

मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांचा पहिला पंजाबी म्यूझिक व्हिडिओ अल्बम लाँच झाला आहे. यात ती पंजाबी/बॉलिवूड मिक्स संगीत गीते गाताना दिसत आहे. काही तासांपूर्वी यू-ट्यूबवर रिलीज झालेल्या या गाण्यांनी खूप धमाल केली आहे. सीएम पत्नी अमृताची या पंजाबी अवतारबाबत सोशल मीडियात खूप कौतूक होत आहे. यापूर्वी अमृताचा एक हिंदी अल्बम अभिनेता अमिताभ बच्चन यांच्यासोबत रिलीज झाला होता. काय खास आहे या अल्बममध्ये...

 

- साड्डी गली/रेल गाडी नावाचा या व्हिडिओ अल्बममध्ये अमृता संपूर्ण पंजाबी बॅंडसह परफॉर्म करताना दिसत आहे.
- सुमारे 4 मिनिटाच्या या अल्बमला टी-सीरीजने रिलीज केले आहे. यात अमृता वेस्टर्न क्लॉथ घालून परफॉर्म करताना दिसत आहे.
- अमृतासोबत अल्बममध्ये पंजाबी सिंगर दीप मोनी आणि प्रीत हरपालने यात आपला आवाज दिला. 
- अमृताचा पंजाबी सिंगर अवतार सोशल मीडियात खूप व्हायरल होत आहे.
- हा व्हिडिओ आपल्या ट्विटर पेजवर शेयर करताना अमृताने लिहले की, "Watch & listen to the dhamaal song... SADDI GALLI/RAIL GADDI"

 

क्लासिकल सिंगर आहे अमृता-

 

- अमृता अॅक्सिस बॅंकेत व्हाईस प्रेसीडंट आहे. अमृता फडणवीस क्लासिकल सिंगर सुद्धा आहे. 
- अमृता नागपूरमधील प्रसिदध गायनॉकॉलिजस्ट डॉ. चारु रानडे आणि आय स्पेशालिस्ट डॉ. शरद रानडे यांची मुलगी आहे.
- 1979 मध्ये जन्मलेल्या अमृताचे लग्न 2005 मध्ये देवेंद्र फडणवीससोबत झाले. दोघांना दिविजा नावाची एक मुलगी आहे.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंबंधित माहिती व फोटोज.....

बातम्या आणखी आहेत...