आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना शुक्रवारी खोकल्याचा त्रास सुरु झाल्याने मुंबईतील जेजे रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच गेल्या दोन दिवसांपासून त्यांना झोपही न आल्याने त्यांना वाताचा त्रास जाणवू लागल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांची पुन्हा कारागृहात रवानगी करण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनातर्फे देण्यात आली. छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला असून येत्या २८फेब्रुवारी रोजी त्यांच्या अर्जावर सुनावणी अपेक्षित आहे. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने पीएमएलए कायद्यातील काही कलमे रद्द करण्याचे आदेश दिले हाेते. त्याअाधारे भुजबळांनी विशेष पीएमएलए न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावरील सुनावणीदरम्यान सक्तवसुली संचालनालयाने भुजबळांच्या जामिनाला विरोध केल्याने विशेष न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला होता. दरम्यान, भुजबळांच्या सुटकेसाठी त्यांच्या समर्थकांनी राज्यभर अांदाेलन सुरू केले अाहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.