आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साम, दाम, दंड, भेदचा कथित क्लिपद्वारे ‘सीएम’चे अादेश; उद्धव ठाकरेंचा गाैप्यस्फाेट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 मुंबई -  पालघर लाेकसभा पाेटनिवडणुकीत शिवसेना-भाजप एकमेकांविराेधात अधिकच अाक्रमक झाले अाहेत. शुक्रवारी शिवसेनेेने या मतदारसंघात पैसे वाटप करणाऱ्या १२ जणांना पकडून पाेलिसांच्या स्वाधीन केले. भाजप उमेदवार राजेंद्र गावितांसाठी हे पैसे वाटले जात  असल्याचा आरोप केला. त्यानंतर   उद्धव ठाकरेंनी सभेत मुख्यमंत्र्यांची कथित अाॅडिअाे टेपच जाहीर केली.

 

या क्लिपमध्ये मुख्यमंत्र्यांनी           विजयासाठी साम, दाम, दंड, भेद  या सर्व नीतीचा मित्रपक्षा विराेधात (शिवसेना) वापर करण्याचे अादेश अापल्या कार्यकर्त्यांना दिले असल्याचा अाराेप ठाकरेंनी केला अाहे. 

 

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या क्लिपमध्ये छेडछाड करण्यात अाली अाहे. शिवसेनेच्या या खाेडसाळपणाविराेधात निवडणूक अायाेगाकडे तक्रार करणार असल्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्र्यांच्या भाषणाची खरी क्लीप उद्या माध्यमांसमाेर अाणणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 

कथित अाॅडिअाे क्लिप
‘अापल्याला मोठी लढाई लढायची आहे. आपल्या अस्तित्वाला कोणी आव्हान देत असेल, विश्वासघात करत असेल, मित्र म्हणता म्हणता... पाठीत खंजीर खुपसत असेल तर आपण एवढा मोठा अॅटॅक आपण केला पाहिजे की भाजप काय आहे हे त्यांना लक्षात आलं पाहिजे. हे लक्षात ठेवा... साम, दाम, दंड, भेद... ही निवडणूक जर जिंकायची असेल तर जशास तसं उत्तर दिलं पाहिजे. तुमच्या पाठीशी ताकदीनं आणि खंबीरपणे मी उभा आहे. ‘अरेला कारे’च करायचं..

 

पैसे वाटणारे १२ जण शिवसैनिकांनी पकडले

पालघरच्या डहाणू येथील रानशेत भागात पैसे वाटप सुरू असल्याची माहिती शिवसेनेला मिळाली. त्यानंतर शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार अमित घौडा यांनी तिथे जाऊन पैसे वाटणाऱ्या १२ तरुणांना पकडले. चौकशी केली असता भाजप पदाधिकारी आंबोरे यांनी पैसे वाटण्यास सांगितल्याचे या तरुणांनी सांगितले. ही बातमी कळताच मंत्री एकनाथ शिंदे, खासदार अनिल देसाई, संजय राऊत या नेत्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा असल्याने सर्व नेते डहाणूत हाेते.

 

शिवसैनिकांनी पकडलेल्या तरुणांकडे ३५ पाकिटे हाेती, त्यात प्रत्येकी दीड हजार रुपये असल्याचे उघडकीस अाले. त्यांच्याकडे मतदारांची यादीही सापडली. पैसे दिलेल्यांच्या नावापुढे खूणही करण्यात आली हाेती. पाेलिसांनी या १२ जणांवर गुन्हा दाखल करून त्यांची चाैकशी सुरू केली अाहे. निवडणूक आयोगाकडेही तक्रार दाखल करून भाजप उमेदवार राजेंद्र गावित यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी शिवसेना करणार अाहे.  

 

शिवसेनेचा अाराेप : भाजपकडून पैशाचा पाऊस  
खासदार अनिल देसाई म्हणाले, भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्यासाठीच हे पैसे वाटप केले जात हाेते. त्यामुळे  त्यांची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात येणार अाहे. खासदार संजय राऊत म्हणाले, ‘मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजप पालघरमध्ये पैशाचा पाऊस पाडत अाहे. एक मंत्री आणि दोन आमदार हॉटेलमध्ये ठाण मांडून बसले असून त्यांच्या खोल्यांची झडती घेतल्यास पाच कोटी रुपये सापडतील.’  


भाजपचे प्रत्युत्तर :  पैसे वाटप ही शिवसेनेची संस्कृती  
भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी अाराेपाचे खंडन केले. ते म्हणाले, ‘पकडलेल्या तरुणांना अाम्ही अाेळखतही नाही. त्यांच्याशी आमचा संबंध नाही. मात्र या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. ही तर शिवसेनेची स्टंटबाजीच अाहे. पैसे वाटप करणे ही भाजपची संस्कृती नाही, उलट शिवसेनेकडूनच असे प्रकार केले जातात. या निवडणुकीत भाजपचे पारडे जड दिसू लागल्याने असे अाराेप केले जात अाहेत.’

बातम्या आणखी आहेत...