आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सभेत घुसलेले कार्यकर्ते समता सैनिक दलाचेच;औरंगाबादच्या सभेबाबत आठवले यांचा खुलासा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- औरंगाबाद येथे रविवारी विद्यापीठ नामांतर वर्धापन दिनाच्या रिपाइंच्या सभेतील गोंधळ करणारे कार्यकर्ते समता सैनिक दलाचे होते.  रिपब्लिकन गटाचे ऐक्य करावे, अशी त्यांची मागणी होती. ती रास्तही आहे. मात्र, माझी ऐक्यवादी भूमिका असल्याचे सांगितल्यानंतर ते सर्व शांत झाले, असे सांगत नामांतर सभा उधळली हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे, असा खुलासा रिपाइं अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले सोमवारी केला.    


मी रिपब्लिकन ऐक्याला कायम तयार आहे. मात्र, भारिप अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर हेच ऐक्याला तयार नाहीत. जे ऐक्याला विरोध करतात त्यांच्या सभेत घोषणाबाजी झाली पाहिजे, असे आठवले म्हणाले. 


अॅड. प्रकाश आंबेडकरांकडे बोट   
समता सैनिक दल ही डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली संघटना आहे. या सभेच्या अध्यक्षा अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या मातोश्री आहेत. सभेतील गोंधळ आंबेडकर पुरस्कृत होता, असा अंगुलिनिर्देश आठवले यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...