आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव ठाकरेंचा फाेन येताच शिवसेनेचे खासदार व केंद्रीय मंत्री गितेंनी उपवास ‘साेडला’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/ मुंबई- लाेकसभेत गाेंधळ घालणाऱ्या  काँग्रेसच्या निषेधार्थ पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्यासह भाजपच्या खासदारांनी गुरुवारी देशभर लाक्षणिक उपोषण केले. दुसरीकडे, शिवसेनेने भाजपसह काँग्रेसच्याही उपाेषणावर मुखपत्रातून कठाेर टीका करत ‘माेर- लांडाेराची स्पर्धा’ अशी उपमा दिली हाेती. याच शिवसेनेचे खासदार व केंद्रीय मंत्री अनंत गिते दिल्लीत भाजप नेत्यांच्या मांडीला मांडीला लावून उपवास करताना दिसले, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. हे कळताच उद्धव ठाकरेंनी गितेंची फाेनवर कानउघाडणी केली व काही वेळातच गितेंनी व्यासपीठ सोडले.


पंतप्रधान माेदींनी सर्व मंत्र्यांना उपाेषणात सहभागी हाेण्याचे अावाहन केले हाेते. त्यानुसार मी उपस्थित होतो, असे गिते म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...