आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाजपासून ST 18 टक्के भाडेवाढ; वेतनवाढीच्या बोज्यामुळे महामंडळाचा निर्णय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - वाढता इंधन खर्च व कामगारांच्या वेतनवाढीचा बाेजा पडलेल्या एसटी महामंडळाने प्रवाशांच्या तिकीट दरात १५ जूनपासून तब्बल १८ टक्के भाडेवाढ केली अाहे.  तसेच याचबरोबर यापुढे तिकिटाची भाडे आकारणी ही ५ रुपयांच्या पटीने करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. म्हणजे एखाद्या प्रवासाचे तिकीट ७ रुपये असेल तर त्याऐवजी ५ रुपये आकारले जातील. तसेच ८ रुपये तिकीट असल्यास १० रुपये तिकीट दर आकारला जाईल. सुट्ट्या पैशांसाठी प्रवासी आणि वाहकांदरम्यान हाेणारी वादावादी टाळण्यासाठी महामंडळाने हा ताेडगा काढला अाहे. 

बातम्या आणखी आहेत...