आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हमीभावात वाढ करण्याच्या निर्णयामुळे बाजारात तेजी; सेन्सेक्समध्ये २६७, निफ्टीत ७० अंकांची वाढ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- केंद्रीय मंत्रिमंडळाने हमीभावात वाढ करण्यास मंजुरी दिल्यानंतर भारतीय शेअर बाजारात तेजी नोंदवण्यात आली. जागतिक पातळीवरून मिळालेल्या नकारात्मक संकेतानंतरही भारतीय बाजार मजबुतीसह बंद झाले. मुंबई शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स २६७ अंकांच्या वाढीसह ३५,६४५ या पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह १०७६९ या पातळीवर बंद झाला. औषधी, वाहन, धातू आणि बँक शेअरमध्ये खरेदी दिसून आली. निफ्टीमध्ये समावेश असलेल्या ११ पैकी आठ निर्देशांक हिरव्या निशाणीवर बंद झाले. रिलायन्स इंडस्ट्रीजमध्येही १.५ टक्क्यांपेक्षा जास्त तेजी नोंदवण्यात आल्यामुळे बाजाराला आधार मिळाला. सकाळी व्यवहाराची सुरुवातही मर्यादेत झाली होती. 


भारतीय बाजारात बुधवारच्या व्यवहाराच्या सुरुवातीला आशियाई बाजारात आलेली कमजोरी, कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये आलेली तेजी आणि देशांतर्गत एकही मोठा संकेत नसल्यामुळे व्यवहाराची सुरुवात मर्यादेत झाली. दुपारी केंद्रीय मंत्रिमंडळाने हमी भावात वाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर भारतीय शेअर बाजारात चांगली खरेदी नोंदवण्यात आली. स्मॉलकॅप निर्देशांकात २९ अंकांची वाढ नोंदवण्यात आली असून मिडकॅपवरील दबावदेखील कमी झाला. बुधवारी आशियातील सर्व प्रमुख बाजारांत घसरण नोंदवण्यात आली. मंगळवारी डाऊ जोन्स अाणि नॅसडॅकदेखील कमजोरीसह बंद झाले होते. व्यवहारादरम्यान पॉवर ग्रीड, डॉ. रेड्डी, लुपिन, एचडीएफसी, आरआयएल, ऑरकॉम, देना बँक, रिलायन्स नवल, पीएफबी हाउसिंग फायनान्स आणि अतुल लिमिटेडमध्ये ३.३७ टक्क्यांची तेजी नोंदवण्यात अाली, तर हिंदाल्को, वेदांता लिमिटेड, एअरटेल, ग्रॅसिम, श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स, वक्रांगी, क्वालिटी आणि फोर्टिसच्या शेअरमध्ये १२ टक्क्यांपर्यंतची घसरण नोंदवण्यात आली. 


वाहन, बँक आणि औषधी शेअरमध्ये तेजी 
व्यवहारादरम्यान निफ्टीत समावेश असलेले ११ पैकी ८ निर्देशांक हिरव्या निशाणीवर बंद झाले. औषधी, वाहन आणि बँकांच्या शेअरमध्ये सर्वाधिक तेजी नोंदवण्यात आली. वाहन निर्देशांकात १.२५ टक्के, बँक निफ्टीमध्ये ०.८८ टक्के आणि खासगी बँकांच्या निर्देशांकात ०.३८ टक्क्यांची तेजी नोंदवण्यात आली. रिअल्टी निर्देशांकात ०.४७ टक्के, एफएमसीजी निर्देशांकात ०.४६ टक्क्यांची तेजी राहिली. धातू निर्देशांकात ०.१३ टक्क्यांची तेजी नोंदवण्यात आली. आयटी निर्देशांकात ०.६८ टक्के, तर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या निर्देशांकात ०.२३ टक्क्यांची घसरण झाली.