आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपत येण्यासाठी अजून खूप रांगेत : मुख्यमंत्री फडणवीस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात निरंजन डावखरे यांना भाजपमध्ये प्रवेश देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. साेबत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील. - Divya Marathi
प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात निरंजन डावखरे यांना भाजपमध्ये प्रवेश देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. साेबत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील.

मुंबई -राष्ट्रवादीचे काेकण पदवीधरचे आमदार निरंजन डावखरे यांनी गुरुवारी भाजपत प्रवेश केला. भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘भाजपत येण्यास अजून खूप लोक रांगेत आहेत,’ असा गौप्यस्फोट केला. चांगला कार्यकर्ता म्हणून निरंजन यांना भाजपमध्ये प्रवेश दिला असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. या     वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे- पाटील उपस्थित होते.  


‘निरंजन पुन्हा कोकण पदवीधर मतदारसंघातून निवडून येतील. पक्षात यायला अजून खूप लोक रांगेत आहेत. त्यांच्याविषयी आताच सांगणार नाही. पण, वेळ आल्यावर तुम्हाला ते कळेलच,’ असे फडणवीस म्हणाले. शरद पवार मोठे नेते आहेत. त्यांच्याविषयी आदर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचा गतीने विकास करत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला काम करायचे आहे, अशी इच्छा निरंजन डावखरे यांनी व्यक्त केली.  


नरेंद्र पाटील वाटेवर  
माथाडी नेते व स्व. अण्णासाहेब पाटील यांचे चिरंजीव आमदार नरेंद्र पाटील भाजपच्या वाटेवर आहेत. पाटील सध्या राष्ट्रवादीचे परिषदेतील आमदार आहेत. पाटील यांनीच डावखरे यांना राष्ट्रवादीत आणल्याचे बोलले जाते. डावखरे यांना भाजपच्या प्रदेश कार्यालयात सोडायला स्वत: नरेंद्र पाटील आलेले होते.  

 

राष्ट्रवादी टू भाजप  
माजी प्रदेशाध्यक्ष बबनराव पाचपुते, माजी मंत्री विजयकुमार गावित, भिवंडीचे नेते कपिल पाटील, सांगलीचे संजय काका पाटील, माजी राज्यमंत्री संजय सावकारे, बीडचे सुरेश धस, विनायक मेटे, मुरबाडचे किसन कथोरे, नवी मुंबईच्या मंदा म्हात्रे, मुंबईतील भारती लव्हेकर या नेत्यांचा राष्ट्रवादीतून भाजपत प्रवेश यापूर्वी झालेला आहे.   

 

बातम्या आणखी आहेत...