आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'संपर्क फॉर समर्थन\': नितीन गडकरींनी घेतली सलीम खान व सलमान खानची भेट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नितीन गडकरी यांनी आज दुपारी ज्येष्ठ पटकथा लेखक सलीम खान आणि अभिनेता सलमान खान यांची भेट घेतली. - Divya Marathi
नितीन गडकरी यांनी आज दुपारी ज्येष्ठ पटकथा लेखक सलीम खान आणि अभिनेता सलमान खान यांची भेट घेतली.

मुंबई- केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज दुपारी ज्येष्ठ पटकथा लेखक सलीम खान आणि अभिनेता सलमान खान यांची भेट घेतली. नितीन गडकरी 'संपर्क फॉर समर्थन' या अभियानांतर्गत आज मुंबईत विविध मान्यवरांच्या भेटी घेत आहेत. यात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, येस बॅंकेचे अध्यक्ष राणा कपूर यांचा समावेश आहे. कपूर यांची सायंकाळी चार वाजता वरळीतील त्यांच्या घरी तर पाटेकर यांची रात्री नऊ वाजता अंधेरी येथील घरी गडकरी भेट घेतील.

 

केंद्रातील मोदी सरकारची कामगिरी समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांपर्यंत पोहचविण्यासाठी भाजपकडून 26 मे ते 11 जून या कालावधीत 'संपर्क फॉर समर्थन' या अभियान राबवले जात आहे. पक्षाचे अध्यक्ष अमित शहा हे याअंतर्गत देशभरातील मान्यवरांच्या भेटी घेत आहेत. आता त्याचाच भाग म्हणून गडकरी हे सुद्धा या उपक्रमात सामील झाले आहेत.

 

अमित शहा बुधवारी मुंबई दौ-यावर होते. त्यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, अभिनेत्री माधुरी दिक्षीत, ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांची भेट घेतली होती तर गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली होती. 

 

आता गडकरी यासाठी सरसावले आहेत. त्यानुसार आज दुपारी बारा वाजता वांद्रेतील सलीम खान यांच्या निवासस्थानी मोदी सरकारची चार वर्षातील कामगिरीची माहिती दिली. यावेळी त्यांचा मुलगा व प्रसिद्ध अभिनेता सलमान खान उपस्थित होता. यावेळी खान कुटुंबियांनी गडकरींचे स्वागत केले.

 

बातम्या आणखी आहेत...