आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

No Confidence Motion: मतदानावेळी सभागृहात गैरहजर राहणार शिवसेना खासदार, उद्धव ठाकरेंचे आदेश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मोदी सरकारवरील अविश्‍वास ठरावासंदर्भात शिवसेनेने आपली भुमिका अखेर स्‍पष्‍ट केली आहे. शिवसेनेचे खासदार या ठरावावेळी सभागृहात गैरहजर राहणार आहेत. ते मतदानात सहभागी होणार नाहीत. असे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्‍याकडून सर्व शिवसेना खासदारांना देण्‍यात आले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी सकाळी ही माहिती दिली. त्‍यांनी सांगितले की, मतदानात सहभागी न होता तटस्‍थ राहण्‍याचा निर्णय उद्धव ठाकरेंकडून घेण्‍यात आला आहे.

 

सरकारमध्ये प्रमुख घटक पक्ष असलेल्या परंतु भाजपवर टीका करून नाराजी व्यक्त करणाऱ्या शिवसेनेची अविश्वास ठरावाबाबतची भूमिका काल (गुरूवारी) रात्री उशिरापर्यंत स्पष्ट नव्हती. पक्षाची भूमिका शुक्रवारी सकाळी स्पष्ट केली जाईल, असे शिवसेनेच्या संसदीय पक्षाचे नेते आनंद अडसूळ यांनी सांगितले होते.

 

याविषयी संजय राऊत यांनी सांगितले की, आज (शुक्रवारी) सकाळी शिवसेनेच्‍या पार्लमेंटरी बोर्डला फोन करून उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका कळवली. देशासमोर अनेक प्रश्‍न आहेत. अशावेळी अविश्‍वास ठरावाच्‍या या नाटकात शिवसेना सहभागी होणार नाही, असे उद्धव यांनी सांगितले. तशी सुचना सर्व शिवसेना खासदारापर्यंत पोहोचवण्‍यात आली आहे, असे राऊत यांनी सांगितले.

 

 

बातम्या आणखी आहेत...