आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • मंत्रालयातील लोकशाही दिनामध्ये सर्व अर्ज निकाली, प्रलंबित अर्ज शुन्यावर, No Pending Application In Maharashtra Ministry

नवलच: मंत्रालयातील लोकशाही दिनामध्ये सर्व अर्ज निकाली, प्रलंबित अर्ज शुन्यावर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- 'सरकारी काम अन् दहा महिने थांब', असाच काहीसा अनुभव सर्वसामान्‍यांना येत असतो. साध्‍या कामांसाठीही अर्जफाटे करून नाकीनऊ आल्‍याचे आपण ऐकतो. मात्र मंत्रालयातील लोकशाही दिनामध्‍ये सर्व अर्ज निकाली निघले. तसेच एकही अर्ज आता प्रलंबित नाही, हे ऐकूण तुम्‍हाला नक्‍कीच आश्‍चर्य वाटेल.


मात्र नुकत्‍याच हाती आलेल्‍या माहितीनूसार, मंत्रालयात मे 2018 पर्यंत झालेल्या 107 लोकशाही दिनांमधील सर्व अर्ज निकाली निघले आहेत. यामध्‍ये 1 हजार 470 तक्रारींवर तोडगा काढण्यात आला आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 108वा लोकशाही दिन घेण्यात आला. यावेळी 11 तक्रारींवर मुख्यमंत्र्यांनी सुनावणी केली.

 

दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी मंत्रालयात ऑनलाईन लोकशाही दिन आयोजित केले जातो. आतापर्यंत एकूण 107 लोकशाही दिन झाले असून 1470 तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्या वेळीच निकाली काढल्याने मे 2018 अखेरपर्यंत प्रलंबित अर्जांची संख्या शुन्य आहे. आज झालेल्या लोकशाही दिनात सातारा, वसई, कांदिवली, पुणे, ठाणे जळगाव, बुलढाणा, वेंर्गुला येथील नागरिकांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार मांडली. त्यावर योग्य ती कार्यवाही करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणेला निर्देश दिले.


यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव  नितीन करीर, मनीषा म्हैसकर उपस्थित होते.   

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...