आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- फिल्म ‘मोदी काका का गांव' अखेर शुक्रवारी देश भरातील चित्रपटगृहात रिलीज होत आहे. फिल्मचे आधी नाव ‘मोदी का गांव' असे ठेवण्यात आले होते, जे बदलून आता ‘मोदी काका का गांव' केले आहे. या फिल्मला अनेक कारणांनी सेन्सारने प्रमाणपत्र देण्यात नकार दिला होता. अखेर 11 महिन्यांनतर ही फिल्म रिलीज होत आहे. फिल्म पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासांच्या मुद्यावर प्रेरित आहे. फिल्म निर्मात्याला फिल्म रिलीज करण्यासाठी याचे नाव बदलावे लागले. फिल्ममध्ये मुख्य भूमिका करणारे विकास महांतेंचा चेहरा पंतप्रधान मोदींशी मिळता-जुळता आहे. मुंबईत राहणारे महांते यांना पाहण्यासाठी संभांना सुद्धा गर्दी होते. फिल्मचे आधी नाव ‘मोदी का गांव’ ठेवले होते. त्यामुळे या फिल्मला सेन्सार बोर्डाने प्रमाणपत्र देण्यास नकार दिला होता.
येथे रिलीज होईल फिल्म-
- निर्माता सुरेश झा यांनी म्हटले आहे की, पहिल्या टप्प्यात हिंदीतील फिल्म महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, उत्तर प्रदेश, पूर्व पंजाब व उत्तराखंडमधील 600 स्क्रीनवर रिलीज होईल. यानंतर देशातील दुस-या भागात रिलीज केली जाईल.
पीएमओ कार्यालयाकडून मागितली होती एनओसी-
- सेन्सार बोर्डाचे तत्कालीन अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी या फिल्मचे निर्माता सुरेश झा यांना म्हटले होते की, फिल्मला सेन्सार प्रमाणपत्र घेण्याआधी पंतप्रधान कार्यालयाची ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) आणावे.
- झा यांनी 'दिव्यमराठी'शी बोलताना सांगितले की, सेन्सार बोर्डाकडून प्रमाणपत्र न मिळाल्याने मी फिल्म ट्रिब्यूनलमध्ये गेलो. ट्रिब्यूनलने फिल्मच्या नावात बदल करत रिलीज करण्याची परवानगी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.