आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नॉन एसी स्लीपर कोच एसटी बस सुरू करणार; परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- शिवशाही व अश्वमेध अत्याधुनिक बसेस अाणून एसटी महामंडळाचा कायापालट करण्यात अाला. आता देशात प्रथमच नॉन एसी स्लीपर कोच बसेस एसटीच्या ताफ्यात  येणार आहेत. लांब पल्ल्याच्या मार्गावर या गाड्या चालवल्या जाणार असून याचे प्रवास भाडेही सगळ्यांना परवडतील असेच ठेवले जातील, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली. रावते यांनी सांगितले, एसटीच्या ताफ्यात स्लीपर कोच नाहीत.  देशात सगळीकडे स्लीपर कोच या वातानुकूलित आहेत, परंतु आपल्या ग्रामीण भागातील नागरिकांना लक्षात ठेवून कमी दरात ही सोय कशी देता येईल याचा विचार करत असताना अाम्ही नॉन एसी स्लीपर कोच आणण्याचे ठरवले. परंतु नॉन एसी स्लीपर कोचला परवानगी नसल्याने या बसला परवानगी मिळेल का, असा प्रश्न समोर होता. एसटी महामंडळाने नॉन एसी स्लीपर कोच तयार केला आणि केंद्राकडे परवानगीसाठी पाठवला होता. काही दिवसांपूर्वीच आम्हाला केंद्र सरकारने परवानगी दिली आणि या बस राज्यात धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


या बसेस कोठून आणणार, असा प्रश्न विचारला असता रावते म्हणाले, या बसेस आम्ही स्वतःच तयार करणार आहोत. पहिल्या टप्प्यात ११२ बसेस आणण्याचा आमचा विचार आहे. जुन्या बसेसची चेसिस घेऊन त्यावर आम्ही ही बस तयार करत आहोत. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आरामात झोपून प्रवास करणे शक्य होणार आहे. स्लीपर कोच असल्याने या बसमध्ये सीट कमी असतील, तरीही याचे दर आम्ही आवाक्यातलेच ठेवणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

लग्नकार्य प्रवासासाठी ‘शिवशाही’ला  पसंती
रावते म्हणाले, शिवशाही बसला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत अाहे. खासगी कार्यक्रमांसाठीही या बसेसची मागणी वाढली आहे. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमासाठी ६० बसेस घेण्यात आल्या होत्या. 

बातम्या आणखी आहेत...