आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ मते नव्हे, तर लाेकांची मनेही जिंकायची आहेत : आदित्य ठाकरे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- पालघरमध्ये साम, दाम, दंड, भेद वापरून त्यांचा विजय झाला तो कागदावर, आपला नैतिक विजय झाला आहे. यापुढे आपल्याला मतदारांची केवळ मतेच जिंकायची नसून त्यांची मनेही जिंकायची आहेत. यापुढील लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत एकहाती सत्ता आणण्यासाठी मी शपथ घेत आहे,  असे  युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिला. शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहोळ्यात आदित्य ठाकरे यांनी प्रथमच शिवसैनिकांना संबोधित केले.  


शिवसेनेचा ५२ वा वर्धापन दिन साेेहळ्यात कार्यक्रमाची सुरुवात आदित्य यांच्या हस्ते करण्यात आली. एकीकडे अमित शहा यांच्या ‘मातोश्री’ भेटीने युतीची चर्चा सुरू असताना आदित्य यांनी मात्र युती होणार नसल्याचे दाखवून दिले. ते म्हणाले, निवडणुका कधीही लागू शकतात त्यासाठी कामाला लागा. आपण कोणाच्याही जिवावर मोठे झालो नाही. शिवसेनेला महाराष्ट्रापुरते मर्यादित ठेवायचे नाही, तर देशभरात शिवसेना न्यायची आहे. आतापर्यंत आपण स्वतःची ताकद आजमावून पाहिलीच नाही. पण यापुढे स्वबळावर लढायचे, जिंकायचे आणि एकहाती सत्ता आणायची. तुमच्या इतकेच किंबहुना तुमच्यापेक्षाही जास्त कष्ट करण्याची माझी तयारी आहे. आजपासूनच कामाला लागा. सत्ता असताना आणि नसताना आपण जे काही करतो ते इतर कोणताही पक्ष करत नाही.’


राजस्थानमध्येही लढणार  
‘एका २८ वर्षांच्या मुलाला तुम्ही मान दिला, तरुणाई हीच आपली ओळख. वय जरी वाढलं तरी मनाने थकू नका हे बाळासाहेबांचं वाक्य लक्षात ठेवा,’ असे सांगून आदित्य ठाकरे म्हणाले, सत्तेत राहून सत्ताधाऱ्यांवर आपण अंकुश ठेवतो. इतर राज्यात आपण निवडणुका लढवल्या आहेत आता राजस्थानमध्ये निवडणूक लढवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...