आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन पीडितांचा व्हिडिअाे टि‌्वट; राहुल गांधींना नाेटीस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- विहिरीत पाेहण्याच्या कारणावरून जळगाव जिल्ह्यातील वाकडी (ता. जामनेर) गावातील दाेन मागासवर्गीय अल्पवयीन मुलांना शेतमालक व त्याच्या सालगड्याकडून मारहाण करण्यात अाली हाेती. या घटनेचा व्हिडिअाे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी टिवटरवर शेअर करून भाजप व संघावर टीका केली हाेती. याप्रकरणी महाराष्ट्र राज्य बालहक्क अायाेगाने राहुल गांधी व टिवटर कम्युनिकेशन प्रा.लि. कंपनीला नाेटीस बजावली अाहे. 


पीडित २ मुलांची अाेळख उघड केल्यावरुन त्यांना १० दिवसांत उत्तर सादर करण्याचे अादेश दिले आहेत. याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार दिली हाेती. बालहक्क अायाेगाचे अध्यक्ष प्रवीण घुगेंनी त्याची दखल घेत नाेटीस बजावली. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी मात्र अद्याप अाम्हाला नाेटीस मिळाली नसल्याचे सांगितले. 'अायाेगाने ज्या व्हिडिअाेसाठी काँग्रेस अध्यक्षांना नाेटीस बजावली अाहे ताे त्यांनी टि्वट करण्याअाधीपासूनच साेशल मीडियावर व्हायरल झाला हाेता.


किमान सहा महिने तुरुंगवास शक्य 
राहुल गांधी यांनी १५ जून राेजी केलेल्या टि्वटमधून अल्पवयीन पीडित मुलांची अाेळख उघड झाल्याने बालहक्क संरक्षण कायद्याचे उल्लंघन झाल्याचा अाराेप तक्रारकर्ते अमाेल जाधव यांनी केला अाहे. हा अाराेप सिद्ध झाल्यास किमान सहा महिन्यांचा तुरुंगवास हाेऊ शकताे. 

बातम्या आणखी आहेत...