आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Opportunity For Last Year Failure In St Mahamandal Exam

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एसटी महामंडळाकडून गतवर्षीच्या भरतीतील अनुत्तीर्णांना पुन्हा संधी, 3 हजार पदांची भरती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने गेल्या वर्षी कोकण विभागात चालक तथा वाहकांच्या ७ हजार ९२९ पदांसाठी जाहिरात दिली होती. या पदांसाठी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत उत्तीर्ण मात्र चालन चाचणीत अनुत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची पुन्हा चाचणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


कोकण विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याची गरज  लक्षात घेऊन नव्याने ३ हजार पदांची भरती करण्याचा निर्णयही महामंडळाने घेतल्याची माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी विधानसभा व विधान परिषदेत दिली. उमेदवार व लोकप्रतिनिधींनी अपात्र उमेदवारांची पुन्हा चालन चाचणी घेण्याची मागणी केली होती. कोकण प्रदेशातील चालक तथा वाहक पदाच्या रिक्त जागा तातडीने भरणे आवश्यक आहे. या बाबीचा विचार करून महामंडळाने चालन चाचणीत अनुत्तीर्ण उमेदवारांची नव्याने चाचणी घेण्याचा निर्णय घेतला. किरकोळ त्रुटींमुळे चालन चाचणीत अपात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पुन्हा छाननी करून त्यांना संधी देण्याचा निर्णयही महामंडळाने घेतला आहे.