आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Monsoon Session: शिवसेनारूपी सावित्री ठामपणे उभी, त्यामुळे सरकार टिकून; विरोधकांची बोचरी टीका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- उद्या (बुधवारपासून) सुरू होत असलेल्‍या पावसाळी अधिवेशनापूर्वी सरकारने बोलावलेल्‍या चहापानावर विरोधकांनी बहिष्‍कार टाकला आहे. शिवसेनारूपी सावित्री सरकारच्‍या पाठीशी ठामपणे उभी असल्‍यानेच हे सरकार टिकून आहे, अशी बोचरी टीका विरोधकांनी केली आहे. आज (मंगळवारी) नागपूरात विरोधी पक्षातील प्रमुख नेत्‍यांची बैठक झाली. बैठकीमध्‍ये विधानसभेचे विरोधी पक्षनेते वि.खे.पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते व राष्‍ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे, माजी मुख्‍यमंत्री पृथ्‍वीराज चव्‍हाण व इतरही नेते उपस्थित होते. 


या मुद्द्यांवरून विरोधक राज्‍य सरकारला घेरणार 
थेट मुख्‍यमंत्र्यावर मुंबई सिडकोतील जमीन गैरव्‍यवहार प्रकरणाचे पडसाद या अधिवेशनात पडण्‍याची शक्‍यता आहे. आतापर्यंत विरोधकांनी मंत्रिमंडळातील मंत्र्यांवर भ्रष्‍टाचाराचे आरोप केले आहेत. मात्र या जमीन गैरव्‍यवहारावरून विरोधक थेट मुख्‍यमंत्र्यांना टीकेचे लक्ष करून आगामी निवडणुकांच्‍या पार्श्‍वभुमीवर वातावरण आपल्‍या बाजुने वळविण्‍याचा जोरदार प्रयत्‍न करण्‍याची शक्‍यता आहे. यासोबतच कर्जमाफीतील गोंधळ, खरीप हंगामात शेतक-यांना कर्ज देण्‍यास होत असलेला विलंब, पिक विमा, अफवेमुळे राज्‍यभरात जमावाकडून होत असलेल्‍या हत्‍या व त्‍या रोखण्‍यात सरकारला आलेले अपयक्ष, पावसामुळे मुंबईत होणा-या दुर्घटना व मुंबईकरांचे हाल, कर्जमाफीनंतरही शेतक-यांच्‍या न थांबलेल्‍या आत्‍महत्‍या, या मुद्द्यांवरून विरोधक राज्‍य सरकारला घेरण्‍याचा प्रयत्‍न करतील. 


जनतेच्‍या प्रश्‍नांविषयी सरकारला जाब विचारू- वि.खे. पाटील
अधिवेशनाला सुरूवात होण्‍यापूर्वी विरोधी पक्षनेते वि.खे. पाटील यांनी सरकारवर हल्‍लाबोल केला आहे. 'शेतकरी, सामान्‍य माणूस, दलित, आदिवासी कोणालाही हे सरकार आपले वाटत नाही. त्‍यांच्‍या धोरणांचा सर्वांना फटका बसला आहे. या  मुद्द्यांवर अधिवेशनात आम्‍ही सरकारला जाब विचारू', असे वि.खे. पाटील यांनी म्‍हटले आहे. तर धनंजय मुंडे यांनी सामान्‍यांच्‍या विविध समस्‍यांना वाचा फोडण्‍याचा आमचा प्रयत्‍न असेल, असे म्‍हटले आहे.   

 

बातम्या आणखी आहेत...