आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विरोधकांचे जातीचे, आमचे विकासाचे राजकारण; गडकरींचे प्रतिपादन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई -  विकासाच्या राजकारणाला उत्तर देता अाले नाही की जाती-पातीचे राजकारण सुरू हाेते. त्यामुळे ज्यांना जातीपातीचे राजकारण करायचे अाहे त्यांना ते करू द्या. अापण विकासाचे राजकारण करत राहू, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी मुंबईत केले.


 फडणवीस सरकारच्या गेल्या साडेतीन वर्षांतील कामगिरीचा अाढावा घेणाऱ्या पत्रकार अाशिष चांदोरकर लिखित ‘मॅन अाॅन मिशन माेड’ या पुस्तकाचा प्रकाशन साेहळा मंगळवारी सह्याद्री अतिथीगृहात झाला. या पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बाेलत हाेते.  गडकरी म्हणाले की, राज्यात गेल्या २० वर्षांत सिंचनाची फक्त ३० ते ३५ टक्केच कामे झाली. परंतु सरकारने साडेतीन वर्षांत अनेक महत्त्वाचे प्रकल्प उभे केले तसेच ते कार्यान्वित केले. त्यामुळे सर्वसामान्यांच्या अायुष्यात परिवर्तन घडून अाले. विकासकामाच्या प्रश्नाला उत्तर देता येत नाही तेव्हा जातीचे राजकारण केले जाते. गेल्या २० वर्षांत राज्यात १०८ लघु, मध्यम सिंचन प्रकल्प रखडले हाेते. त्यापैकी ६० प्रकल्प दाेन वर्षांत पूर्ण झाले. 

 

बातम्या आणखी आहेत...