आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालघर निवडणूक: उद्धव ठाकरे- हितेंद्र ठाकूर यांची सदिच्छा भेट, शिवसेनेशी छुपी युती?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- पालघर लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बुधवारपासून पालघर परिसरात तळ ठोकून आहेत. दरम्यान, प्रचारासाठी फिरत असताना बहुजन विकास आघाडीचे प्रमुख व आमदार हितेंद्र ठाकुर यांनी उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. यावर दोघांत काही मिनिटे चर्चा झाली. तुम्ही माझे   मोठे बंधू आहात, असे सांगत हितेंद्र ठाकूर यांनी उद्धव ठाकरेंचे कौतूक केले. तर आम्ही शिट्टी वाजवत येतो, तुम्ही भगवा घेऊन या असे ठाकूर यांना हास्य-विनोदात सांगितले. 

 

पालघर पोटनिवडणुकीत भाजप सध्या एकाकी पडली आहे. राजेंद्र गावित यांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये. दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांनी पालघर परिसर पिंजून काढत आहे. तर वसई, विरार व नालासोपारा या शहरी भागात हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे एकतर्फी वर्चस्व आहे. त्यामुळे शहरी भागात भाजपचा टक्का घसरेल असा अंदाज बांधला जात आहे. त्यातच आता उद्धव ठाकरे आणि हितेंद्र ठाकूर यांची सदिच्छा भेट झाल्याने शिवसेना व बविआ यांच्यात काही छुपा समझोता तर नाही ना अशी शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे. हितेंद्र ठाकूर यांच्या बविआने ग्रामीण भागातील प्रचार कमी केल्याचे सांगितले जात आहे जेणेकरून शिवसेनेला फायदा होईल. दुसरीकडे, काहींचे म्हणणे आहे की, हितेंद्र ठाकूर यांना भाजपने इशारा दिला आहे की, जर तुम्ही बळीराम जाधव यांच्यासाठी जोर लावला तर बघून घेऊ. ठाकूर यांचे वसई-विरार पट्ट्यात बांधकाम व्यावसायातील प्रकरणे बाहेर काढण्याची धमकी फडणवीस यांनी दिल्याचे सांगितले जात आहे.

 

'आम्ही (शिवसेना) शिट्टी वाजवत येतो, तुम्ही भगवा घेऊन या' या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यात काही दडले आहे काय अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...