आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परभणी जिल्ह्यातील शाैचालय कामात अनियमितता; पंकजा मुंडेंचे कारवाईचे आश्‍वासन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- स्वच्छ भारत अभियानात सुमारे ३ ते ४ काेटी रुपयांची अनियमितता करणाऱ्या तत्कालीन परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अाणि इतर अाठ गटविकास अधिकारी यांच्यावर अधिवेशन संपण्यापूर्वी कारवार्इ करण्यात येर्इल, असे अाश्वासन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मंगळवारी विधान परिषदेतील प्रश्नाेत्तरांच्या तासात दिले.  


राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अब्दुल्लाखान दुर्राणी यांनी या संदर्भातील तारांकित प्रश्न विचारला हाेता. परभणी जिल्ह्यात उभारण्यात अालेल्या शाैचालयाच्या कामात माेठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असून दाेषींवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. त्यावर उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या, शाैचालयाचे काम एनजीअाेला दिल्याची तक्रार हाेती. ते नियमबाह्य असल्याचे सांगून विभाग अायुक्तांकडून यासंदर्भात अहवाल अाल्यानंतर अधिवेशन संपण्यापूर्वी कारवार्इ करण्यात येर्इल.  तत्पूर्वी या प्रकरणातील दाेषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी अशी जाेरदार मागणी विराेधी पक्षनेते धनंजय मुंडे, भार्इ जगताप, जयंत पाटील अाणि दुर्राणी यांनी या वेळी केली.

बातम्या आणखी आहेत...