आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंकजा मुंडेंना भाजपमध्ये भविष्यात मानाचं पान? राष्ट्रीय महिला नेत्यांसोबत स्थान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्याच्या महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे महत्त्व भाजपला कळू लागले आहे. तरूण, तडफदार व ओबीसी वर्गातील पंकजा मुंडेंना आता भाजपमध्ये राष्ट्रीय महिला नेत्यांच्या बरोबरीने स्थान मिळू लागले आहे. कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी पुढील महिन्यात 12 मे रोजी मतदान होत आहे. या निवडणूकीसाठी भाजपने देशातील काही प्रमुख महिला नेत्यांवर प्रचाराची धुरा सोपवली असून त्यात पंकजा मुंडेंचा समावेश करण्यात आला आहे.

 

केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन, माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी, खासदार पूनम महाजन, साध्वी निरंजना, डी. पुरंदरेश्वरी आदी राष्ट्रीय महिला नेत्यांच्या पंक्तीत पंकजा मुंडेंना स्थान दिले आहे. त्यामुळे पंकजा मुंडेंना भाजपमध्ये भविष्यात मानाचं पान मिळू शकते असे बोलले जात आहे. 

 

पंकजा मुंडे यांनी कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचारासाठी रविवारी (ता. 28) बीदर (कर्नाटक) जिल्ह्याच्या दौ-यावर होत्या. बीदरमध्ये महिला संवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते तेथे पंकजा यांनी महिलांना मार्गदर्शन केले. 'कर्नाटकमधील बिदर शहरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या करनाडू महिला संवाद सभेमध्ये उपस्थित महिलांशी अतिशय मोकळेपणाने संवाद साधला. महिलांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक व समाधानकारक उत्तरे दिली. कर्नाटकमध्ये प्रवेश केल्या केल्या येत्या निवडणुकीत भाजपच्या विजयाचे वारे वाहत असल्याचे जागो जागी मिळत असलेल्या प्रतिसादाने स्पष्ट समजले', असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

 

पंकजा मुंडे यांनी बीदरमध्ये तर हुबळीत पूनम महाजन, स्मृती इराणी बेळगावात तर निर्मला सीतारामन यांनी बेल्लूर भागात महिला मेळाव्यात भाजपचा प्रचार केला.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, पंकजा मुंडेंचे कर्नाटकमधील प्रचारादरम्यानचे फोटोज....

बातम्या आणखी आहेत...