आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परशुराम वाघमारेच पत्रकार गौरी लंकेशचा मारेकरी, 5 राज्यांत टोळी एसआयटी चा दावा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - पत्रकार गौरी लंकेश हत्याकांडात संशयित म्हणून अटकेत असलेल्या परशुराम वाघमारे यानेच त्यांच्यावर गोळी झाडली होती. एसआयटीने शुक्रवारी हा दावा केला. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, वाघमारे हा कट्टरपंथीय संघटनांतील लोकांना एकत्र करून बनवण्यात आलेल्या टोळीचा सदस्य होता. कोणतेही नाव नसलेल्या या टोळीचे ६० सदस्य आहेत. त्यांचे मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, गाेवा व कर्नाटकात नेटवर्क आहे. 


अधिकाऱ्यानुसार, टोळीने महाराष्ट्रातील हिंदु जागृती समिती व सनातन संस्थेसारख्या हिंदुत्ववादी संघटनांतून लोकांची भरती केली होती. मात्र या संस्था थेट हत्येत सहभागी नसाव्यात. सुजितकुमार ऊर्फ प्रवीण हा टोळीसाठी लोकांची भरती करत असे. त्याच्याच चौकशीतून ही माहिती समजली. 


लेखक भगवान यांच्या हत्येचा कट

ही टोळी सतर्कतेने कट आखायची. हत्येआधी ६ महिने ते १ वर्ष नियोजन केले जात असे. हेरगिरी करून सावजाची कमकुवत बाजू समजून घेतली जात होती. ही टोळी कानडी लेखक प्रा. एस. भगवान यांच्या हत्येच्या शेवटच्या टप्प्यात होती. पण एसआयटीने वेळीच त्यांच्या मुसक्या आवळल्या.

 

हत्येत एकाच बंदुकीचा वापर

एसआयटीनुसार, गौरी लंकेश, गोविंद पानसरे व एम.एम. कलबुर्गी यांच्या हत्येसाठी एकाच बंदुकीचा वापर झाला. फॉरेन्सिक तपासात याची खात्री पटली आहे. तिन्ही प्रकरणांत गोळीच्या मागील बाजूला सारखीच खूण आढळली. मात्र नेमकीे कोणती बंदूक वापरली हे कळलेले नाही. 

बातम्या आणखी आहेत...