Home »Maharashtra »Mumbai» Pawar-Shelar Visits Attract Political Discussion

पवार-शेलार भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण, MCAबाबत चर्चा झाल्याचा अंदाज

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी संध्याकाळी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांंची त्यांच्या घरी जाऊ

विशेष प्रतिनिधी | Apr 11, 2018, 01:02 AM IST

  • पवार-शेलार भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण, MCAबाबत चर्चा झाल्याचा अंदाज

मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी संध्याकाळी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांंची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले. ही भेट अनौपचारिक असल्याचे म्हटले जात असले तरी मुंबई क्रिकेट संघटनेतील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दोघांत चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. शेलार एमसीएचे अध्यक्ष असून लोढा समितीच्या शिफारशीनुसार त्यांना हे अध्यक्षपद सोडावे लागणार आहे.

न्यायालयाने एमसीएवर प्रशासकांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला. १६ एप्रिल रोजी एमसीएच्या घटनात्मक दुरुस्तीसाठी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. वाद, आरोप-प्रत्यारोप यामुळे ही सभा वादळी होण्याची चिन्हे आहेत. त्या अनुषंगाने तासभर चाललेल्या या भेटीत चर्चा झाली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Next Article

Recommended