आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदींना पाठवली बांगड्यांची भेट, मालेगावमध्‍ये महिलांवरील वाढत्‍या अत्‍याचाराचा निषेध

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मालेगाव - उन्नाव, कठुअा, सुरत येथील अत्याचाराच्या घटनांमुळे देशातील प्रत्येक महिला स्वत:ला असुरक्षित समजत अाहे. “बेटी बचाअाे’, “नारी सन्मान’च्या घाेषणा देणारे भाजप सरकार महिलांना सुरक्षा देण्यात अपयशी ठरले अाहे. सत्तेच्या नशेत संविधान पायदळी तुडवले जात असल्याचा अाराेप करत संविधान बचाव कमिटीने पंतप्रधानांना बांगड्यांची भेट पाठवून वाढत्या महिला अत्याचाराच्या घटनांचा निषेध केला.    


संविधान बचाव कमिटीच्या महिला सदस्यांनी किदवाई राेडवरील शहिदाें की यादगार स्मारकाजवळ  गुरुवारी रात्री अांदाेलन केले. चाैकात मध्यभागी काचेची पेटी ठेवण्यात अाली हाेती. रस्त्याने ये-जा करणाऱ्या महिलांसह कमिटी महिला सदस्यांनी या पेटीत बांगड्या टाकून सरकारवर नाराजी व्यक्त केली. याप्रसंगी माजी अामदार मुफ्ती माेहंमद इस्माईल यांनी पंतप्रधानांवर टीका केली. महिला सबलीकरणाचा नारा देणारे माेदी सरकार गुन्हेगारांची पाठराखण करत अाहे. हातात राष्ट्रध्वज घेऊन अाराेपींचे उघडपणे समर्थन केले जात अाहे. सरकारचा वचक नसल्याने महिला असुरक्षित अाहेत. सरकारला जाब विचारण्यासाठी शनिवारी जिल्हाधिकारी आंदोलन करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...