आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल यांच्या गळाभेटीनंतर स्वामी म्हणाले, मोदींनी Medical Test करावी; मुंबईत झळकले असे बॅनर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई / नवी दिल्ली - संसदेत अविश्वास ठरावावर चर्चा सुरू असताना राहुल गांधींनी पीएम मोदींना दिलेल्या गळाभेटीवर भाजप खासदार सुब्रह्मण्यम स्वामींनी टीका केली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी संसदेत घेतलेली गळाभेट अनैतिक होते. यातून संसदेत पंतप्रधानांना मिळणाऱ्या सुरक्षेवर सुद्धा काही संकेत मिळतात. आता नरेंद्र मोदींनी या गळाभेटीनंतर मेडिकल टेस्ट करून घ्यावी. भाजपने यापूर्वीच राहुल यांचा हा व्यवहार पोरकटपणा असल्याचे म्हटले आहे. पीएम मोदींनी शनिवारी उत्तर प्रदेशच्या एका सभेत राहुल यांचा समाचार घेतला. तर दुसरीकडे राहुल गांधी आणि नरेंद्र मोदींची गळाभेट आणि अमित शहा यांचा मुंबई दौरा यांचे औचित्य साधून मुंबईत काँग्रेसकडून मोठ-मोठे बॅनरलावण्यात आले आहेत. 


शरीफची गळाभेट घेऊ शकतात, मग राहुल का नाही? -काँग्रेस 
काँग्रेस प्रवक्ते जयवीर शेरगिल यांनी राहुल यांच्या गळाभेटीनंतर काँग्रेसवर टीका करणाऱ्यांची खरडपट्टी काढली. पीएम मोदी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याशी हस्तांदोलन आणि गळाभेट घेऊ शकतात, मग राहुल गांधी यांची का नाही? राहुल गांधींच्या गळाभेटीनंतर मोदींच्या चेहऱ्यावर हसू फुलेल अशी आम्हाला अपेक्षा होती. परंतु, मोदींना धक्का बसला. यानंतर काँग्रेसने रविवारी मुंबईत संसदेत घडलेल्या घटनेचे मोठे बॅनर लावले आहेत. विशेष म्हणजे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा संवाद अभियान निमित्त रविवारी मुंबईत आहेत.

बातम्या आणखी आहेत...