आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- टेलीव्हिजन शो 'कुमकुम भाग्य' मध्ये आलियाचे कॅरेक्टर आणि आपल्या निगेटिव्ह प्रतिमेसाठी प्रसिद्ध असलेली फेमस टीव्ही अॅक्ट्रेस शिखा सिंहने आपला एक फोटो सोशल मीडियात अपलोड केला होता. त्या फोटोबाबत एका पोलिसाने एक वाईट कमेंट केली आणि एक चुकीची मागणी केली. दरम्यान, त्या पोस्टवरील कमेंट वाचून शिखाने ती पोस्ट पब्लिकली करून मुंबई पोलिसांना टॅग केले. या डिपार्टमेंटमध्ये काम करतोय पोलिस...
- शिखा सिंह द्वारा पोस्ट केलेल्या स्क्रीन शॉट्सच्या माहितीनुसार, वाईट कमेंट करणा-या पोलिसाचे नाव जगदीश गुंगे आहे.
- जगदीश गुंगेचे हे इन्स्ट्रागाम अकाउंट प्रायवेट आहे आणि त्यात लिहले आहे की, तो RTO (मोटर व्हेईकल डिपार्टमेंट, मुंबई) मध्ये आहे.
- जगदीशने कमेंट केली होती की - BEAUTIFUL, PL UPLOAD SOME HOTTEST POSES WITH BIKINI OR MICROMINIS AS NEW YEAR GIFT. (सुंदर, प्लीज नव्या वर्षाचे बक्षिस म्हणून बिकिनी आणि मायक्रो मिनी घातलेले काही बोल्ड फोटो अपलोड कर)
- या मागणीवरून नाराज झालेल्या शिखाने त्याची ही कमेंट पोस्ट केली. ज्यानंतर सर्व लोकांनी त्या पोलिसांला चांगलेच फैलावर घेतले व शिखाच्या हिंमतीची दाद दिली.
पोस्टसोबत शिखाने हे लिहले-
- पोलिसवाल्याला धडा शिकविण्यासाठी शिखाने त्या पोस्टसोबत लिहले की, हे गरजेचे नाही की, तुम्ही तुमच्याशी असभ्य वागण्याने जेव्हा तुम्हाला फिजिक्ली टच करतात. एखाद्या व्यक्तीबद्दल असे काही लिहणे, बोलणे त्याची बेइज्जत करण्यासारखेच आहे. तुम्ही यातून वाचू शकत नाही. जगदीश गुंगे तुम्हाला लाज वाटायला हवी.
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, शिखाने सांगितले की, तिला अनेक प्रकारच्या कमेंट्स येतात पण ही कमेंट पाहिली मी माझ्या मित्राला सांगितले.
- माझ्या फ्रेंडने जेव्हा त्याचे प्रोफाईल चेक केले तेव्हा समजले की, हे प्रोफाईल एका पोलिसाचे आहे. त्यानंतर त्याला व मुंबई पोलिसांना टॅग करत त्याला धडा शिकवला.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, पोलिसाने काय केली कमेंट आणि शिखाने दिलेले उत्तर व फोटोज...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.