आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा नगरपंचायती आणि नगर परिषदांसाठी 15 जुलैला मतदान; राज्य निवडणूक आयुक्तांची माहिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई -  भोर (जि. पुणे), वडगाव (पुणे), मुक्ताईनगर (जळगाव), बार्शी टाकळी (अकोला), वानाडोंगरी (नागपूर) आणि पारशिवनी (नागपूर) या नगर परिषदा,  नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जुलै राेजी मतदान हाेणार अाहे. तसेच राज्यातील इतर ११  नगर परिषदा, नगरपंचायतींत रिक्त पदांसाठीही याच दिवशी पाेटनिवडणूक हाेईल. या सर्व जागांची १६ जुलै राेजी मतमाेजणी हाेऊन निकाल जाहीर हाेईल. राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी ही माहिती दिली.


या सर्व पालिका क्षेत्रांत अाचारसंहिता लागू झाली अाहे. १९ ते २५ जूनदरम्यान उमेदवारी अर्ज सादर केले जातील. २६ जून राेजी छाननी हाेईल.  २ जुलैपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येतील.  


पोटनिवडणूक होत असलेल्या जागांचा नगर परिषद/ नगरपंचायतनिहाय तपशील : जव्हार (पालघर)-  प्रभाग ६ ब, पोलादपूर (रायगड)- प्रभाग १६, राजापूर (रत्नागिरी)- अध्यक्ष, पंढरपूर (सोलापूर)- १० ब, वाई (सातारा)- ५अ, मेढा (जि. सातारा)- १५, निफाड (जि. नाशिक)- ६, श्रीरामपूर (जि. अहमदनगर)- १२ अ, नंदुरबार (जि. नंदुरबार)- १६ अ, लोहारा बु. (जि. उस्मानाबाद)- २, मोहाडी (जि. भंडारा)- १२ आणि शेगाव (जि. बुलडाणा)- हद्दवाढ क्षेत्र.

 

बातम्या आणखी आहेत...