आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रात्यक्षिक परीक्षांमुळे शाळा मूल्यमापन पुढे ढकलले; मुख्याध्यापकांना मिळाला दिलासा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यातील अ श्रेणी प्राप्त शाळांचे शनिवारपासून सुरू होणारे बाह्यमूल्यमापन ऐनवेळी पुढे ढकलण्यात आले आहे. तसे पत्र राज्यातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना पुण्यातील महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाने पाठवले आहे. दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांमुळे मूल्यमापन पुढे ढकलण्यात येत असून मूल्यमापनाच्या पुढील तारखा नंतर  कळवण्यात येतील. 


१० ते १७ फेब्रुवारीदरम्यान शाळा सिद्धी अंतर्गत राज्यातील अ श्रेणीच्या सर्व शाळांचे बाह्यमूल्यमापन करण्यात येणार होते. मूल्यमापनामध्ये शाळांतील पायाभूत सुविधांची खातरजमा करण्यात येत असते. त्याचे जिल्हावार नियोजनही झाले होते. काही शिक्षक, मुख्याध्यापक संबंधित शाळांमध्ये पोहोचले देखील होते. मात्र, ६ फेब्रुवारीपासून दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरू झाल्या आहेत. या काळात मूल्यमापनासाठी शिक्षक आणि मुख्याध्यापक अनेक दिवस परगावी गेल्यास त्याचा परिणाम त्यांच्या शाळांतील प्रात्यक्षिक परीक्षांवर होईल, अशी भीती शिक्षक संघटनांनी व्यक्त केली होती. त्यामुळे मूल्यमापन पुढे ढकलावे, अशी विनंती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाने केली होती. त्यानंतर तातडीने आदेश निघाल्याचे महामंडळाचे अध्यक्ष जयसिंह गायकवाड यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...