आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्रिपुरामधील निवडणुकीचा निकाल अपेक्षितच- पृथ्‍वीराज चव्हाण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - त्रिपुरात काँग्रेसची पूर्णपणे वाताहत झाली होती. काही उरले नव्हते. सभांना १०० माणसेही गोळा होत नव्हती. तेव्हाच मी म्हटले होते की काही खरे नाही. भाजप मुसंडी मारेल असे वाटत होते आणि तसेच झाले, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी “दिव्य मराठी’शी बोलताना दिली. तसेच ८ ते १० राज्ये हातातून घालवणाऱ्या सी. पी. जोशी यांच्यावर राहुल गांधी विश्वास का दाखवतात, असा प्रश्नही त्यांनी केला.   


त्रिपुरा विधानसभेच्या निवडणुकाच्या वेळी पृथ्वीराज चव्हाण दोन दिवस प्रचारासाठी त्रिपुराला गेले होते. निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशाबद्दल विचारता पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, दहा वर्षांपूर्वी जेव्हा मी त्रिपुराचा प्रभारी होता तेव्हा तेथे काँग्रेसची चांगलीच ताकद होती. कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर होते. परंतु आता जेव्हा मी गेलो तेव्हा काँग्रेसची पूर्णपणे पडझड झालेली दिसून आली. सभांना १०० माणसे जमवतानाही नाकी नऊ येत होते त्यामुळे काही खरे नाही. एकही जागा येणार नाही, असे मला वाटत होते आणि तेच खरे झाले. 

 
खरे तर ज्यांच्यावर त्रिपुराची जबाबदारी टाकली होती त्या सी. पी. जोशींनी तीन वर्षांत त्रिपुरात पाऊलच ठेवले नाही, असे सांगून पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, त्यामुळे काँग्रेसचे जे काही कार्यकर्ते होते तेसुद्धा निघून गेले. काँग्रेस पूर्णपणे संपल्याचा फायदा भाजपला झाला. सी. पी. जोशींवर अनेक राज्यांची जबाबदारी होती. त्यापैकी बिहार, मणिपूर, बंगाल आदी ८ ते १० राज्ये त्यांनी काँग्रेसच्या हातातून घालवली. तरीही राहुल गांधी त्यांच्यावर विश्वास का ठेवतात, असा प्रश्न पडला आहे. परंतु ते आमच्याच पक्षाचे असल्याने काही बोलताही येत नाही, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...