आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तर पुणे- मंबईचा प्रवास केवळ 12 मिनिटांत, जमिनीवरील विमानच जणू हायपरलूम ट्रेन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/ पुणे- वेगवान प्रवासासाठी हायपरलूप वन कंपनी सध्या जगभरात चर्चेत आहे. याच कंपनीने केलेल्या एका भौगोलिक अहवालानुसार मुंबई ते पुणे या शहरादरम्यानचा कॉरिडोर सर्वात योग्य असल्याचे म्हटले आहे. जगभरातील वाहतूककोंडीवर समस्येसाठी हायपरलूप सेवा पर्याय ठरू शकते असे वाहतूक तज्ञांचे म्हणणे आहे. दरम्यान, लॉस एजिलस बेस्ड हायपरलूप वन कंपनी आणि पीएमआरडीए यांचा संयुक्त अहवालाने या मार्गासाठी ग्रीन सिग्नल दिला आहे.

 

या कंपनीने ​पुणे-मुंबई दरम्यान तीन संभाव्य मार्ग सुचवले आहेत. यात पुणे ते नवी मुंबई व्हाया ट्रान्स हार्बर लिंक,  पुणे ते मुंबई व्हाया एक्स्प्रेस वे आणि पुणे तो नवी मुंबई व पुढे सांताक्रूज ते सेंट्रल मुंबई असे हे संभाव्य तीन मार्ग सुचवले आहेत. यात पुणे ते मुंबई व्हाया एक्स्प्रेस वे हा सर्वाधिक सुटेबल मार्ग असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. मुंबईत हायपरलूप स्थानक उभारण्यासाठी दादर, सांताक्रुझ किंवा आंतरराष्ट्रीय विमानतळ हे तीन पर्याय देण्यात आले आहेत.

 

महाराष्ट्र सरकारच्या पीएमआरडीएने या प्रकल्पाला मान्यता दिली आणि ठरल्याप्रमाणे करार मार्गी लागला तर 2026 पर्यंत मुंबई-पुणे दरम्यान हायपरलूम सेवा सुरू होऊ शकते. यानंतर या दोन शहरामधील अंतर केवळ 12 ते 14 मिनिटांवर येऊ शकेल. मुंबई-पुणे दरम्यान केवळ दोन ते तीन स्टेशन्स असू शकतात. प्रवासी आणि कार्गोची जलदगतीने वाहतूक करण्यासाठी हायपरलूपचा व्यावसायिक पातळीवर उपयोग केला जातो. सर रिचर्ड ब्रॅनसन यांनी कॅलिफोर्नियात व्हर्जिन हायपरलूप कंपनीची स्थापना केली.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा व वाचा, काय आहे हायपरलूम तंत्रज्ञान....

बातम्या आणखी आहेत...