आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महेशच्या प्रमाणपत्रांबाबत प्रश्नचिन्ह, वादाला सुरूवात; खेळाडूंनी सादर केली खोटी प्रमाणपत्रे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- प्रत्येक शिवछत्रपती पुरस्कारांची घोषणा नव्या वादाचे मोहळ उठवत असते. मात्र, नंतर येणाऱ्या हरकती आणि आक्षेप टाळण्यासाठी क्रीडा खात्याने सर्व पुरस्कारार्थी इच्छुकांची यादीच त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांसह संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली. २० जानेवारीपर्यंतच्या मुदतीत तब्बल १४१ हरकती आल्या. मात्र, या वेळी वादाचे मोहोळ उठले आहे कुस्तिगीर महेश मोहोळ या पहिलवानाला देण्यात आलेल्या प्रमाणपत्रांच्या सत्यतेविषयीच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यामुळे. महेश मोहोळ यांनी सादर केलेल्या प्रमाणपत्रांबाबत आक्षेप नोंदवले गेले आहेत. दुसरीकडे अनेक क्रीडा संघटनांच्या सचिवपदावर किंवा अन्य पदांवर काम करणाऱ्यांनी स्वत:च शिवछत्रपती पुरस्कारांसाठी अर्ज केल्यामुळे ‘परस्पर हितसंबंधांचा’ प्रश्न निर्माण झाला आहे. आतापर्यंत ही बाब चालवून घेतली जात होती. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात पुरस्कारासाठी निवड करताना हा मुद्दा महत्त्वाचा आहे किंवा नाही? याची खातरजमा क्रीडा खात्याने करायला हवी, अशी मागणी पुढे येत आहे.  


पुरस्कारांसाठी अर्ज करताना अर्जदार खेळाडू व अन्य उमेदवारांनी सत्यतेची शपथ घेऊनच अर्ज सादर केलेले असतात. मग खोट्या प्रमाणपत्रांची किंवा स्वत:च पुरस्काराचा लाभ उठवण्याचा प्रयत्न करणे हा गुन्हा ठरू शकत नाही का?  


खेळाडू सादर करतात त्या सर्व प्रमाणपत्रांची व त्यांच्या सत्यतेची जबाबदारी त्या त्या खेळांच्या संघटनेची नाही का? मोहोळ यांना देण्यात आलेल्या काही प्रमाणपत्रांच्या सत्यतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ती प्रमाणपत्रे देणारी कुस्तिगीर संघटना आणि त्यांचे पदाधिकारी हे जबाबदार क्रीडा संघटक आहेत. खोटी प्रमाणपत्रे सादर केल्याबद्दल अशा क्रीडा संघटकांनाही खेळाडूंच्या प्रमादाबद्दल जबाबदार धरण्यात येणार का नाही? याबाबत क्रीडा खात्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले एका खेळाडूने जो सचिवही आहे, त्याने वुत्शू या खेळासाठीच्या क्रीडा पुरस्कारासाठी केलेला अर्ज मागे घेतल्याचे सांगितले. मात्र, तत्सम पुरस्कारांसाठी अर्ज केले असल्याचे सांगून सारवासारव करण्यात आली.

 

अर्ज घेतला मागे
संबधीतांनी आक्षेप अाल्यानंतर आपापले अर्ज मागे घेतले. अनेक खोट्या संशयित प्रमाणपत्रांच्या प्रतीही खेळाडूंच्या फायलीतून गायब झाल्याची शक्यताही वर्तवली जात आहे.  शासनाकडे सादर करण्यात आलेली कागदपत्रे काढून घेणे नियमात बसते का?  कागदपत्रेच जर गायब किंवा गहाळ केली गेली असतील तर त्याबाबत कुणाला जबाबदार धरायचे?

 

 

बातम्या आणखी आहेत...