आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदी व्हिलन तर उद्धव ठाकरे साईड व्हिलन, विखे पाटलांचा सेना- भाजपवर हल्लाबोल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे मोदींना व्हिलन म्हणतात. मोदी जर व्हिलन असतील तर ठाकरेंनाही साईड व्हिलन म्हणावे लागेल कारण मागील साडेतीन वर्षांपासून जो डर्टी पिक्चर चालू आहे त्यात शिवसेनेची नेमकी काय भूमिका आहे हे स्पष्ट करावे. असा हल्लाबोल कांग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. नाणारविषयी शिवसेनेच्या भुमिकेवर टीका करताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.  


विखे पाटील म्हणाले, नाणार प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध म्हणजे भाजपा आणि शिवसेनेत झालेली एक डील आहे. शिवसेनाप्रमुख म्हणतात की नाणार देणार नाही, मग नाणारच्या तहात काय घेणार ? अशा प्रश्न देखील विखेपाटील यांनी केला. ते पुढे म्हणाले की मावळे विकले जात नाहीत म्हणून शिवसेना टिकून आहे हे खरे आहे पण स्वयंघोषित सेनापती मात्र विकले जात आहेत ही दुर्दैवाची बाब आहे. 

 

ठाकरेंना केला सवाल 

मुख्यमंत्र्यांना दिल्लीत कवडीचीही किंमत नसल्याचा आरोप उद्ध्व ठाकरे करतात. असे असेल तर अशा मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात तुमचे मंत्री कायम तरी कशाला राहता? सरकारमधून बाहेर पडण्याच्या शिवसेनेच्या इशाऱ्यांची आता डबल सेन्चुरी होत आली आहे. शिवसेना आता तरी सत्तेतून बाहेर पडणार का असा सवाल त्यांनी यावेळी केली. 

बातम्या आणखी आहेत...