आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संततधारेने मुंबईला सलग दुसऱ्या दिवशीही झाेडपले; येत्या २४ तासांत मुसळधार पावसाचा इशारा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सलग दोन दिवस संततधार पडणाऱ्या पावसाने रविवारीही मुंबईला झोडपून काढले. रविवारी १३ ठिकाणी घराच्या भिंती पडल्या तर कुर्ल्यात ३ मजली इमारतीच्या बाल्कनीचा भाग कोसळला. सुदैवाने कुणी जखमी झाले नाही. दुपारी अडीच वाजेपर्यंत कुलाबा येथे ११२ मिमी तर सांताक्रूझ ३७.२ मिमी पावसाची नोंद झाली. येत्या २४ तासांत मुंबई , ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली अाहे. 


सकाळच्या सुमारास मुंबई अाणि उपनगरात मुसळधार पाऊस झाला. हिंदमाता, चेंबूर, किंग्ज सर्कल, सायन, कुर्ला, दादर, सायन, भायखळा, अंधेरी, वरळी, लालबाग परिसरात सखाेल भागात माेठ्या प्रमाणावर पाणी साचले. त्यामुळे वाहनांना पाण्यातून मार्ग काढणे कठीण जात हाेते. पश्चिम द्रूतगती मार्गावरही वाहतुकीचा वेग मंंदावला. मुसळधार पावसाचा अंदाज घेऊन बेस्ट प्रशासनाने बस मार्गात बदल केले. सकाळच्या धुवाधार पावसामुळे हार्बरमार्गावरील सायन ते टिळकनगर भागात रुळावर पाणी साचले हाेते. मध्य रेल्वेच्या गाड्या जवळपास २० मिनिटे उशिराने धावत हाेत्या. पावसामुळे प्रवाशांची गैरसाेय हाेऊ नये यासाठी मध्य रेल्वेने रविवारचा मेगाब्लाॅक रद्द केला. पावसाची कोसळधार सुरू राहिल्याने कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले. 


मुंबईच्या विविध भागांत पावसाची अशी नोंद झाली 
मुंबईत दुपारी ३ वाजेपर्यंत पालिका मुख्यालय येथे १८७ मिमी, कुलाबा १६७ मिमी, फॉसबेरी मार्ग शिवडी १५८ मिमी कुर्ला १३७ मिमी,घाटकोपर १३२, मिमी, मरोळ १६१ मिमी, वर्सोवा १३१ मिमी व बिकेसी येथे १२६ मिमी येथे सर्वाधिक पाऊस पडल्याची नोंद झाली. हवामान विभागाने येत्या २४ तासांत अतिवृष्टीच्या दिलेल्या इशाऱ्यानंतर पालिकेची सर्व यंत्रणा कार्यान्वित असून सर्व विभागीय अधिकाऱ्यांना आपापल्या विभागात उपस्थित राहण्याचे निर्देश दिले असल्याचे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी दिले अाहेत. 

 

घाटकाेपरातील पूल झुकला, वाहतुक बंद 
घाटकाेपरमधील पूर्व-पश्चिम भाग जाेडणारा पूल खालच्या बाजूने झुकल्याने सुरक्षिततेच्या कारणासाठी हा पूल वाहतुकीसाठी काही काळ बंद करण्यात अाला हाेता. मध्य रेल्वेवर असलेल्या या पुलाखालून मेल, एक्स्प्रेस, लाेकल जातात. डागडुजीनंतर संध्याकाळी हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात अाला. 

बातम्या आणखी आहेत...