आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Mumbai: अमित शहा- उद्धव ठाकरेंच्या भेटीबाबत राज ठाकरेंकडून भन्नाट व्यंगचित्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईत येऊन त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी भेट घेतली. या दोन नेत्यांच्या हाय प्रोफाईल भेटीबाबत देशभर चर्चा झाली. आता मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी व्यंगचित्र काढून तिरकस भाष्य केले आहे. हे दोन नेते एकमेंकाना भेटायला जाताना हातात खंजीर घेऊन आल्याचे व भेटल्यानंतर एकमेंकांच्या पाठीत वार करण्याच्या स्थितीत दाखवले आहेत. तसेच उद्धव ठाकरे आपल्या मंत्र्यांचे राजीनामे खिशात घेऊन गेल्याचे रेखाटले आहे. राज ठाकरे यांनी या व्यंगचित्राला 'भेट आणि मन की बात!' असे म्हटले आहे. 

 

2014 साली विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी अमित शहांना अफझल खान म्हटले होते तसेच भाजपने शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसल्याचे म्हटले आहे. आता तोच संदर्भ घेऊन राज यांनी उद्धव हे सुद्धा खंजीर घेऊन तयार आहेत व दोघे एकमेंकांच्या पाठीत खंजीर खुपसायला तयार आहेत हे दाखवले आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...