आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधींचा \'हात\' अमित शहांच्या घशात, कर्नाटक नाट्यावर राज ठाकरेंचे भाष्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी कर्नाटक नाट्यावर भाष्य करत भाजपच्या जखमांवर मीठ चोळले आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी कुमारस्वामीच्या मदतीने भाजपाध्यक्षा अमित शहांच्या घशात हात घालून सत्ता हिसकावून घेतली अशा आशयाचे व्यंगचित्र काढत कर्नाटक नाट्यावर भाष्य केले आहे. 

 

गेल्या मंगळवारी (15 मे ) रोजी जेव्हा कर्नाटकचे निकाल आले व भाजप सर्वात मोठा (222 पैकी 104) सर्वात मोठा पक्ष ठरला तेव्हा राज ठाकरे यांनी ‘इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सचा’ विजय असो अशा एका वाक्यात प्रतिक्रिया दिली होती. आता आठवड्याभरानंतर राज यांनी व्यंगचित्राद्वारे भाजपच्या जखमांवर मीठ चोळत राहुल गांधींनी अमित शहांच्या घशात हात घालून कशी सत्ता हिसकावली हे दाखवले आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...