आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांगलीत राज ठाकरे- विश्वजित कदमांची भेट, भारती विद्यापीठात पाहुणचार; दोघांत अर्धा तास चर्चा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज सकाळी दहा वाजता युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि पतंगराव कदम यांचे सुपुत्र विश्वजीत कदम यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. - Divya Marathi
आज सकाळी दहा वाजता युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि पतंगराव कदम यांचे सुपुत्र विश्वजीत कदम यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली.

सांगली- मनसेप्रमुख राज ठाकरे सांगली दौ-यावर आहेत. सांगलीतील औदुंबर येथील सदानंद साहित्य मंडळाच्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने राज सांगली शहरात आहेत. आज सकाळी दहा वाजता प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम आणि राज ठाकरे यांची भेट घेतली. ही भेट कदम यांच्या भारती विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये झाली. ही भेट वैयक्तिक स्वरूपाची होती. यात कोणतेही राजकीय चर्चा झाली नाही. मात्र, आमच्या मैत्री आहे आणि त्यामुळे आमच्यात राज्याच्या सामाजिक विषयांवर चर्चा झाली असे विश्वजित कदम यांनी सांगितले. यावेळी मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अनिल शिदोरे हे सुद्धा उपस्थित होते.

 

राज आणि माझ्या कुटुंबियांचे पहिल्यापासून चांगले संबंध आहेत. राज यांना सांगलीतील भारती विद्यापीठाचा कॅम्पस पाहायचा होता त्यामुळे ते शहरात आल्याचे समजताच मी त्यांना निमंत्रित केले असे विश्वजित कदम यांनी सांगितले. विश्वजित कदम हे माजी मंत्री व हेवीवेट नेते पतंगराव कदम यांचे चिरंजीव आहेत तर उद्योगपती अविनाश भोसले यांचे जावई आहेत. 

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, राज यांचे सांगली दौ-यातील फोटोज....

बातम्या आणखी आहेत...