आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोजोस बार, कोरेगाव भीमा घटना: माझ्या तडाख्यातून वाचला असे समजू नका- राज ठाकरेंचा इशारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राज ठाकरे (फाईल फोटो) - Divya Marathi
राज ठाकरे (फाईल फोटो)

मुंबई- गेल्या 20 दिवसात बरंच काही घडलं आहे. माझ्या व्यंगचित्रांचा बॅकलॉग (अनुशेष) वाढला आहे. पण मी अनुशेष ठेवणा-यातला मी नाही. लवकरच तो बॅकलॉग भरून काढणार आहे. माझ्या तडाख्यातून सुटलो असे कोणाला वाटत असेल तर चूक, व्यंगचित्रातून तडाखे बसणारच अशा इशारा मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दिला आहे.

 

राज ठाकरे यांनी आपल्या मुलाचा साखरपुडा झाल्यापासून फारसे सक्रिय नव्हते. मागील काही महिन्यांपासून ते सतत राज्यातील-देशातील राजकीय घडामोडीवर सोशल मिडियाद्वारे भाष्य करत होते. मात्र, डिसेंबर महिन्यात त्यांनी थोडा ब्रेक घेतला होता. मात्र, त्याच दरम्यान मुंबईसह राज्यात ब-याच घटना घडल्या. मोजोस पबसह कोरेगाव भीमाची दुर्घटनाने संपूर्ण राज्य हादरले. मात्र, राज ठाकरे शांत होते. 

 

याबाबत राज ठाकरे म्हणतात की, काही गोष्टी मी पाहत होतो, समजून घेत होतो. यातील बारकावे लक्षात घेत होतो. त्यामुळे माझा बॅकलॉग वाढलाय हे खरं आहे पण लवकरच हा बॅकलॉग भरून काढणार आहे असे राज यांनी म्हटले आहे. आता अधिक काही बोलत नाही. लवकरच व्यंगचित्रांची मालिका पुन्हा सुरु होईल. तुम्हाला आवडेल नक्की. ज्यांना त्रास व्हायचाय त्यांना होईल. बाकी सर्वांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा, असे राज ठाकरेंनी फेसबुकवर संदेश पाठवत सत्ताधा-यांना इशारा दिला आहे. 

 

गेल्या काही दिवसांत राज्यात आणि देशात झालेल्या घटनांवर राज व्यंगचित्रांच्या माध्यमातून बोलतील अशी शक्यता आहे. कोरेगाव-भीमा येथे झालेला हिंसाचार, त्यानंतर पुकारण्यात आलेला महाराष्ट्र बंद, त्यावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया यावर राज भाष्य करू शकतात. त्याशिवाय मुंबईत झालेल्या आगीच्या दुर्घटना, गुजरात आणि हिमाचल मधील निवडणुकीचे निकाल यावर देखील ठाकरी फटकारे पाहायला मिळू शकतील.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, राज ठाकरे यांनी फेसबुकवर नेमके काय म्हटले आहे ते जसेच्या तसे...

बातम्या आणखी आहेत...