आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटकात भाजपने पार केला बहुमताचा आकडा..राज ठाकरे म्हणाले- \'ईव्हीएम मशिनचा विजय असो\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल मंगळवार सकाळपासून समोर येत आहेत. अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत भाजपने काँग्रेसवर मात करत बहुमताचा आकडा पार केला आहे. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणजे, 'इलेक्ट्राॅनिक व्होटिंग मशिनचा विजय असो', असे राज म्हणाले आहेत.

 

अलिबाग येथे 'राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या' कर्मचारी-स्वयंसेविका यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. राज ठाकरे यांनी त्यांच्याशी आंदोलनस्थळी संवाद साधला. त्यांनतर त्यांनी आपल्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरुन ट्वीट करुन कर्नाटक विधानसभा निवडणुकीवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. कर्नाटकमध्ये भाजपने बहुमताचा 110 पेक्षा जास्ता जागांवर आघाडी घेतल्यानंतर काॅंग्रेसच्या काही नेत्यांनी ईव्हीएम मशिनचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला आहे, त्यात राज ठाकरे यांनीही सूर मिसळत निकालावर शंका व्यक्त केली आहे.

बातम्या आणखी आहेत...